EPFO चं नोकरदार वर्गाला सर्वात मोठं गिफ्ट, आता लाखो कर्मचाऱ्यांचं ते स्वप्न पूर्ण होणार
EPFO ( कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) ने पीएफ फंड काढण्याच्या नियमामध्ये आता आणखी एक मोठा बदल केला आहे. यामुळे लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

EPFO ( कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) ने पीएफ फंड काढण्याच्या नियमामध्ये आता आणखी एक मोठा बदल केला आहे. या नियमामुळे जे नोकरदार व्यक्ती आपलं स्वत:च्या हक्काचं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहात आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीएफच्या नव्या नियमानुसार आता ज्यांना घर घ्यायचं आहे, ते आपल्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी आपल्या पीएफ खात्यामधून देखील पैसे काढू शकणार आहेत. यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे, तसेच रिअल इस्टेट क्षेत्राला देखील याचा मोठा फायदा होणार आहे.
फायनांशियल एक्स्प्रेसनं दिलेल्या रिपोर्टनुसार घर खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, नोकरदार वर्गाला घर खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी ईपीएफओने हा निर्णय घेतला आहे. मात्र यासोबतच ईपीएफओकडून असा सल्ला देखील देण्यात आला आहे की, जरी तुम्ही घर खरेदी करण्यासाठी तुमचा पीएफ निधी काढणार असाल तरी देखील तुमच्या रिटायरमेंट फंडकडे दुर्लक्ष करू नका, योग्य ते नियोजन करूनच आपल्याला किती रक्कम काढायची आहे, याबाबत निर्णय घ्या. ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार ज्या व्यक्तीचं पीएफ खातं हे तीन वर्ष जुनं आहे, तो आपल्या खात्यातील 90 टक्के रक्कम काढू शकतो.
अनेक नोकरदार लोकांचं आपलं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न असतं, मात्र अनेकदा डाउन पेमेंटसाठी पैसे नसल्यामुळे हे स्वप्न स्वप्नच राहातं ते काही सत्यात उतरू शकत नाही. मात्र आता अशा लोकांसाठी ईपीएफओचा हा निर्णय अशेचा एक किरण ठरणार आहे, ज्या लोकांना घर घ्यायचं आहे ते आपल्या पीएफ खात्यातील निधी यासाठी आता वपरू शकणार आहेत. ते ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार जर त्यांचं पीएफ खातं तीन वर्ष जुने असेल तर 90 टक्क्यांपर्यंतचा निधी काढू शकतात. यामुळे नोकरदार लोकांना देखील फायदा होणार आहे, सोबतच रिअल इस्टेट क्षेत्राला देखील याचा फयदा होऊन घरांची विक्री वाढू शकते, असं बोललं जात आहे.
