AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO नियमात बदल; एका महिना काम केल्यावरही अशी मिळवा पेन्शन! ती अपडेट काय?

EPFO New Pension Rules 2025 : देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. ईपीएफओच्या नवीन नियमामुळे आता कुणाचाही निवृत्तीचा हक्क नाकारता येणार नाही. काय आहे ती अपडेट, तुम्ही वाचली का?

EPFO नियमात बदल; एका महिना काम केल्यावरही अशी मिळवा पेन्शन! ती अपडेट काय?
ईपीएफओ
| Updated on: Sep 07, 2025 | 11:32 AM
Share

सरकारने नोकरदार वर्गाला मोठी आनंदवार्ता दिली आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना(EPFO) माध्यमातून नोकरदारांना मोठी भेट दिली. जर एखादा कर्मचारी केवळ 1 महिना काम करत असेल तरीही त्याला ईपीएफओ पेन्शनचा, निवृत्ती वेतनाचा लाभ मिळेल. यापूर्वी हा नियम केवळ दीर्घकाळ काम करणाऱ्यांसाठीच होता. त्यांनाच ही सुविधा उपलब्ध होती. आता त्यात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

EPFO Pension Rules Update : केंद्र सरकारने नोकरदारांसाठी पेन्शन नियमात बदल केला आहे. आता 1 महिना काम केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना EPFO पेन्शनचा अधिकार मिळेल. अल्पकालीन नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. खास करून अल्पवधीत नोकरी बदलणारे अथवा काही दिवसांच्या करारासाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

या नियमाचा फायदा बीपीओ,लॉजिस्टिक्स, कंत्राटी अथवा अल्पकालीन क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना होईल. अशा ठिकाणी लोक जास्त दिवस काम करत नाहीत. ते चांगल्या पगाराच्या अपेक्षेत अथवा ठराविक कालावधीमुळे ते नोकरी बदलतात. अशावेळी त्यांची निवृत्ती रक्कम व्यपगत, नाहीशी होत होती. पण नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण होणार आहे.

यापूर्वी नियम काय होता?

यापूर्वीच्या नियमानुसार, 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत काम केले असेल तर त्याला पेन्शन मिळत नव्हती. पण आता हा नियम बदलला आहे. एक महिना काम केल्यानंतरही कर्मचाऱ्याला EPS (कर्मचारी निवृत्तीवेतन योजना) मध्ये त्यांचा समावेश होईल. अशा कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. हा नियम लागू झाल्यानंतर कमी कालावधीसाठी काम करणाऱ्यांना खूप फायदा होईल.

अशी तपासा पेन्शन

  • ईपीएस पेन्शनचा लाभ मिळाला की नाही हे आता लागलीच समोर येईल
  • सर्वात आधी तुमचे ईपीएफ पासबुक तपासा. या पासबुकमध्ये ईपीएस अंतर्गत कपात झालेले पैसे आणि योगदानाचा तपशील समोर येईल.
  • passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/login यावर पासबुक पाहा
  • या संकेत स्थळावर UAN नंबर आणि पासवर्ड टाका. आता लॉगिन करा.

ऑनलाईन करा तक्रार

तुमचे पासबुक निरंक असेल. त्यात योगदान आणि ईपीएस कपातीचा कुठलाही तपशील आढळत नसेल तर याविषयीची तक्रार करता येते. 2024 पासून कर्मचाऱ्यांना EPFO कडे ऑनलाइन तक्रार करता येते. एक महिना काम केले तरी कपातीची रक्कम आणि तुमचे योगदान याचा तपशील पासबुकवर दिसेल. या बदलामुळे तरुणांना आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अल्पकालीन नोकरीतही ते पेन्शनचे हक्कदार झाले आहेत. अल्पकालीन नोकरतीही त्यांचे योगदान सुरक्षित राहील आणि भविष्यात त्यांना पेन्शन मिळू शकेल.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.