AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचा नवीन नियम जाणून घ्या

EPFO Rules: खासगी क्षेत्रात नोकरीवर गंडांतर येणे हे काही नवीन नाही. अथवा नोकरीला रामराम ठोकून काही जण गावी जातात. अशावेळी त्यांचे पीएफ खाते, त्यातील रक्कम, व्याज याचे काय होते? काय सांगतो पीएफ नियम?

EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचा नवीन नियम जाणून घ्या
ईपीएफओ
| Updated on: Aug 07, 2026 | 2:50 PM
Share

खासगी क्षेत्रात काम करणारे अनेक कर्मचारी पगार, भविष्याच्या दृष्टीने नोकरी बदलतात. काही जण नोकरीला रामराम ठोकून गावी व्यवसाय करतात. काही जण ब्रेक घेतात. तुम्ही पण करिअरमध्ये काही दिवस ब्रेक घेण्याचा विचार करत असाल, नोकरी सोडण्याच्या विचारात असाल तर EPFO चा हा नियम वाचा. नियमानुसार, ईपीएफ शिल्लकीवरील व्याज, पैसे काढण्याचा पर्याय आणि कर यासंबंधीचे नियम काय आहेत?

नोकरी सोडल्यानंतर EPF खाते सक्रिय

नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांचे EPF खाते लागलीच बंद होत नाही. ईपीएफ खाते सुरू असते त्यातील शिल्लक रक्कमेवर काही दिवस व्याज मिळते. तुम्ही जर नवीन नोकरीत रूजू झालात तर नवीन योगदान त्यात जमा होते. तुम्ही कायमची नोकरी सोडली तरी काही दिवस त्यावर व्याज मिळते. ईपीएफओ नियमानुसार काही दिवस ही व्याजाची रक्कम मिळते. EPFO खात्यातील जमा झालेल्या पैशांवर 58 वर्षांपर्यंत व्याज मिळते. तुम्ही नोकरी सोडली तरी हे व्याज मिळते. पण त्याला एक अपवाद आहे. जर एखादा कर्मचारी 55 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वय असताना नोकरी सोडत असेल तर जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत त्या रक्कमेवर व्याज मिळते. त्यानंतर त्याचे खाते निष्क्रिय होते. त्यावेळी व्याजाची रक्कम जमा होत नाही.

करिअरमध्ये ब्रेक घेतल्यास पैसा काढावा का?

EPF मधून पैसा काढण्यासंबंधी नियम बदलले आहे. त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. ते EPF शिल्लक रक्कमेतून 75% रक्कम लागलीच काढू शकतात. तर उर्वरीत 25% रक्कम तुम्ही सलग 12 महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिला तर काढता येते. तर काही अर्थतज्ज्ञानुसार, फार गरज नसेल तर EPF सेव्हिंगमधील रक्कम काढू नये. करिअर ब्रेकदरम्यान अगोदरच पैसे काढले तर निवृत्तीवेळी बचत अत्यंत कमी होऊ शकते. तुमच्या दीर्घकालीन बचतीवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही सलग पाच वर्षे नोकरी करण्यापूर्वी EPF बचतीतील रक्कम काढाल तर त्या रक्कमेवर कर लागू शकतो. पाच वर्षे नोकरी पूर्ण केली आणि निवृत्ती, राजीनामा, आजारपण, दिव्यांगता, कंपनी बंद झाल्यावर वा इतर कारणांमुळे रक्कम काढाल तर त्यावर कर द्यावा लागत नाही.

EPF क्लेममध्ये उशीरा झाला तर, काय कराल?

ऑनलाईन EPF दाव्याचा साधारणपणे सात ते दहा दिवसात निपटारा होता. पण त्यासाठी कर्मचाऱ्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असणे अत्यंत आवश्यक आहे. जर 20 दिवसांच्या आत क्लेम प्रोसेस झाले नाही तर सदस्य EPFiGMS पोर्टलवर याविषयी तक्रार दाखल करू शकतात. नवीन नियमानुसार, जर एखाद्या कारणामुळे वेळोवेळी जास्त उशीर होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याला वार्षिक 12% दराने व्याजाचा दंड बसू शकतो.

Follow Us
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला
मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं
Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं; बाकीचे प्रवासी फक्त बघतच राहिले
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?
शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? ठाकरेंचा सरकारवर घणाघात
Raj Thackeray | शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? राज ठाकरेंनी...
Raj Thackeray | प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? NEET पेपरफुटीपासून परदेशी शिक्षणापर्यंत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना...
Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला