AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात पडझड… तज्ज्ञांकडून ‘या’ सेक्टरमधील शेअर खरेदीचा सल्ला

मंगळवारी (31 मे) सकाळी शेअर बाजार, सेंसेक्स 303 अंकाच्या पडझडीसह 55,622 च्या निर्देशांकावर अन्‌ निफ्टी 83 अंकाच्या घसरणीसह 16,578 निर्देशांकावर उघडला. सुरवातीच्या 15 मिनिटांनी सेंसेक्समध्ये 500 अंकाची पडझड नोंदवली गेली. सध्या बाजार 55,423 च्या स्तरावर जाऊन पोहचला आहे.

आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात पडझड... तज्ज्ञांकडून ‘या’ सेक्टरमधील शेअर खरेदीचा सल्ला
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 4:39 PM
Share

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात (Stock market) 1041 अंकांची उसळी बघायला मिळाली होती. दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांनी पुन्हा नफा कमावला, त्यामुळे बाजार घसरणीसह उघडला. मंगळवारी (31 मे) सकाळी शेअर बाजार, सेंसेक्स (Sensex) 303 अंकाच्या पडझडीसह 55,622 च्या निर्देशांकावर अन्‌ निफ्टी (Nifty) 83 अंकाच्या घसरणीसह 16,578 निर्देशांकावर उघडला. सुरवातीच्या 15 मिनिटांनी सेंसेक्समध्ये 500 अंकाची पडझड नोंदवली गेली. सध्या बाजार 55,423 च्या स्तरावर जाउन पोहचला आहे. सेंसेक्सच्या टॉप-30 कंपन्यांमध्ये महिंद्रा ॲंड महिंद्रा, टाटा स्टील, पॉवरग्रिड आणि मारुतीमध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे इन्फोसिस, टायटन, आणि एचडीएफसी सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच घसरण बघायला मिळाली.

वीके विजयकुमार यांनी सांगितले की…

बाजारात सध्या सुरु असलेल्या ट्रेंडबाबत जियोजीत फायनांशियलच्या वीके विजयकुमार यांनी सांगितले, की लार्जकॅपमध्ये रिकव्हरीच्या कारणामुळे काही दिवसांपूर्वी बाजारात तेजीचे वातावरण दिसून येत होते. बऱ्याच काळापासून गुंतवणूकदार विक्रीच्या मूडमध्ये होते. सोमवारी एफपीआयने पुनर्रागमण केले आणि भारतीय बाजारात 502 कोटींची खरेदी केली. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार पुन्हा वापसी करणार की नाही, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. जर विदेश गुंतवणूकदारांची पुन्हा वापसी झाली तर, हे बाजारासाठी एक सकारात्मक चिन्ह असेल.

महागाईत कमी होण्याचा अंदाज असल्याने ग्लोबल मार्केटमध्ये तेजी दिसून येत आहे. अशात फेडरल रिझर्व्हवर जर व्याजराचा दबाव कमी झाला तर यामुळे देखील बाजारावर सकारात्मक परिणाम निर्माण होऊ शकतो. दरम्यान,  बाजारातील पडझडीच्या दरम्यान, आइटी स्टॉक्समध्ये चांगली सुधारणा झालेली आहे. चांगले टेक्नोलॉजी स्टॉक आता चांगल्या किंमतीमध्ये मिळत आहेत. ब्रोकरेज चांगल्या आईटी स्टॉक्सच्या खरेदीचा सल्ला देत आहेत. टेक महिंद्रचा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 40 टक्क्यांनी घसरला आहे.

एलआयसीची सुमार कामगिरी

सोमवारी लाइफ इंशुरन्स कॉर्पोरेशनचा निकाल आला होता. मार्च तिमाहीमध्ये कंपनीच्या प्रॉफिटमध्ये वार्षिक आधारावर 18 टक्क्यांची घसरण बघायला मिळाली असून ती 2371 कोटी रुपये राहिली आहे. नेट प्रीमिअम इनकम 18.2 टक्क्यांच्या तेजीसह 143746 कोटी रुपये राहिली आहे. कंपनीने 1.5 रुपयांच्या डेव्हिडंटची घोषणा केली होती. निकालानंतर आज एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण बघायला मिळाली आहे. या वेळी तो 2.48 टक्क्यांच्या घसरणीसह 815 रुपयांच्या स्तरावर ट्रेंड होत होता.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.