लग्न करताय, मग त्यापूर्वी तुमच्या जोडीदाराला विचारा ‘हे’ प्रश्न, वैवाहिक जीवन होईल अधिक सोपे

लग्नाचा निर्णय घेतेवेळी तुमच्या जोडीदारासोबत आर्थिक व्यवहाराबद्दल चर्चा करणे आवश्यक असते. (Financial Conversations Must Have Before Marriage With Partners)

लग्न करताय, मग त्यापूर्वी तुमच्या जोडीदाराला विचारा 'हे' प्रश्न, वैवाहिक जीवन होईल अधिक सोपे
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : लग्न करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठा निर्णय असतो. त्यातच आपला जोडीदार निवडणे हा फार मोठे आव्हान असते. लग्न करतेवेळी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. लग्नाचा निर्णय घेतेवेळी तुमच्या जोडीदारासोबत आर्थिक व्यवहाराबद्दल चर्चा करणे आवश्यक असते. अनेकदा लग्न झाल्यानंतर पती-पत्नीसोबत आर्थिक गोष्टींवरुन वाद होतात. त्यामुळे लग्नापूर्वीच पैशाशी संबंधित काही प्रश्न असतील, तर ते जोडीदारसोबत बोलून सोडवा. (Financial Conversations Must Have Before Marriage With Partners)

💠आर्थिक स्थिती कशी आहे?

आपल्या जोडीदाराची आर्थिक स्थिती कशी आहे ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्याची कर्जाची स्थिती काय? याचा परिणाम आपल्या भविष्यावर होणार आहे. आपल्या जोडीदाराचे काही कर्ज, मालमत्ता किंवा उत्तरदायित्व काय? या सर्व गोष्टींची आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

💠आर्थिक व्यवहाराबद्दलचा दृष्टीकोन काय?

एखाद्या आर्थिक व्यवहाराबद्दल तुमचा जो दृष्टीकोन आहे, तोच किंवा तसाच आपल्या जोडीदाराचा असावा, असे गरजेचे नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत पैशांबाबतच्या दृष्टिकोनातून नेहमीच चर्चा करा. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे आर्थिक लक्ष्य हे वेगवेगळे असू शकते. त्यामुळे तुमचं आणि तुमच्या आर्थिक व्यवहाराचा गणित एकमेकांशी जुळतात का? तुम्ही भविष्यात आर्थिक नियोजन करु शकता का? यावर चर्चा करणे गरजेचे आहे.

💠आर्थिक जबाबदारी कोण घेणार?

जर आपण दोघे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असाल तर मग घरातील आर्थिक जबाबदारी कोण घेणार, हे ठरवणं गरजेचे आहे. तुमचा खर्च आणि बचत याबाबत दोघांमध्ये ताळमेळ असला पाहिजे. तसेच घरातील खर्च वाटून घेण्याबद्दल तुमच्या जोडीदाराचे मत काय? हे देखील जाणून घ्या.

💠कुटुंबाची जबाबदारी कोणाकडे?

लग्नानंतर तुमच्याकडे दोन कुटुंबांची जबाबदारी येते. लग्नानंतर पती किंवा पत्नीचे कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी, हे गरजेचे नाही. त्याआधी तुम्ही स्वत: च्या कुटुंबाची काळजी घेणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी बचत करत राहा. अनकेदा तुमचे पालक त्यांना तुमची आवश्यकता आहे, असे सांगणार नाहीत. पण त्यापूर्वी या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. याबद्दल तुमच्या जोडीदाराचे नेमकं मत काय? याबद्दल चर्चा करावी.

अनेकदा नातेसंबंधात पैसे आणू नये, असे सांगितले जाते. पण जर तुम्ही पैशासंबंधित चर्चा केली नाही, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लग्नपूर्वी आर्थिक व्यवहाराचे नियोजन योग्यरित्या केल्यास तुमचे वैवाहिक जीवन अधिक सुलभ होईल. (Financial Conversations Must Have Before Marriage With Partners)

संबंधित बातम्या : 

SBI Alert : या खातेदारांना जमा करावे लागेल आधार खाते आणि पॅनकार्ड, चेक करा तुमचेही नाव आहे का?

रेस्टॉरंट आणि ब्यूटी पार्लरही बँकेकडून कर्ज काढू शकणार, RBI ची नवी सुविधा

पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांनंतर 10 लाख रुपये मिळणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI