AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata : रतन टाटा यांच्या जीवनातील पाच किस्से, जे तुम्हाला माहीत नाही…

ratan tata jaguar land rover: सन 1992 मध्ये इंडियन एअरलाइन्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना विचारण्यात आले, दिल्ली ते मुंबई दरम्यान कोणता प्रवाशी आहे, ज्यांनी तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला. त्यात सर्वाधिक कर्मचाऱ्यांनी रतन टाटा यांचे नाव सांगितले. जेव्हा त्याचे कारण शोधले तेव्हा समजले, ते एकमेव असे व्हिआयपी होते, जे नेहमी एकटे जात होते.

Ratan Tata : रतन टाटा यांच्या जीवनातील पाच किस्से, जे तुम्हाला माहीत नाही...
Ratan Tata
| Updated on: Oct 13, 2024 | 3:31 PM
Share

Ratan Tata Death : रतन टाटा यांच्या जीवनात आदर्शवत होते. रतन टाटांच्या औदार्य, माणुसकी आणि नम्रतेच्या अनेक कहाण्या आहेत. त्यांनी नेहमी उद्योगापेक्षाही देशाला प्रथम प्राधान्य दिले. व्यक्ती कितीही मोठा झाला तरी जमीनीवर कसा राहू शकतो, त्याचे उदाहरण म्हणजे रतन टाटा होते.

मानवावर नाही तर प्राण्यांवरही इतके प्रेम

प्रसिद्ध उद्योगपती सुहैल सेठ यांनी रतन टाटा यांच्या जीवनातील एक हृदयस्पर्शी किस्सा शेअर केला होता. सुहेल सेठ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, फेब्रुवारी 2018 मध्ये ब्रिटिश राजघराण्याला रतन टाटा यांना लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करायचे होते. स्वतः प्रिन्स चार्ल्स त्यांचा सन्मान करणार होते. 6 फेब्रुवारी 2018 रोजी रतन टाटा यांचा सन्मान होणार होता. पण, 3 फेब्रुवारी रोजी रतन टाटा यांनी येण्यास नकार दिला. त्यामागे त्यांनी दिलेले कारण प्रिन्स चार्ल्स यांच्या हृदयाला भिडले. रतन टाटा यांनी सुहेल यांना फोन करुन सांगितले मी या अवॉर्ड फंक्शनला येऊ शकणार नाही. कारण टँगो आणि टिटो आजारी आहे. या परिस्थितीत मी त्यांना एकटे सोडू शकत नाही. म्हणजे रतन टाटा मानवावरच नाही तर प्राण्यांवर किती प्रेम करत होते.

कधी सोबत असिस्टंट नसायचा

सन 1992 मध्ये इंडियन एअरलाइन्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना विचारण्यात आले, दिल्ली ते मुंबई दरम्यान कोणता प्रवाशी आहे, ज्यांनी तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला. त्यात सर्वाधिक कर्मचाऱ्यांनी रतन टाटा यांचे नाव सांगितले. जेव्हा त्याचे कारण शोधले तेव्हा समजले, ते एकमेव असे व्हिआयपी होते, जे नेहमी एकटे जात होते. त्यांच्यासोबत त्यांची बॅग आणि फाईल उचलण्यासाठीसुद्धा असिस्टेंट नव्हता. विमानाचे उड्डान होताच ते आपले काम सुरु करत होते. ते नेहमी कमी साखरचे ब्लॅक कॉफी घेत असते. ते कधी फ्लाइट अटेंडेंटवर रागावलेसुद्धा नाही.

कनिष्ठ अधिकाऱ्यांचाही सन्मान

गिरीश कुबेर यांनी टाटा समूहावर ‘द टाटस हाऊ अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अँड अ नेशन’ हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये ते लिहितात, “जेव्हा ते टाटा सन्सचे प्रमुख झाले तेव्हा ते जेआरडीच्या खोलीत बसले नाहीत. स्वत: बसण्यासाठी त्यांनी एक साधी छोटी खोली निवडली. ते एका कनिष्ठ अधिकाऱ्याशी बोलत असताना एक वरिष्ठ अधिकारी आला की त्याला थांबायला सांगायचे. त्याच्याकडे ‘टिटो’ आणि ‘टँगो’ हे दोन जर्मन शेफर्ड कुत्रे होते, ज्यांवर त्याचे अपार प्रेम होते.

वेळ कधी टाळली नाही…

रतन टाटा वेळेचे नेहमी पालन करत होते. ते ठीक ६.३० वाजता आपला कार्यालय सोडत होते. कार्यालयातील कामासंदर्भात घरी कोणी त्यांच्याशी संपर्क केला तर ते रागवत होते. ते घरी एकांतात फाईले आणि दुसरी कामे पार पाडत होते. जर तो मुंबईत असेल तर विकइंडमध्ये ते अलिबाग येथील फार्म हाऊसवर जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत कुत्र्यांशिवाय कोणीही नव्हते. त्यांना प्रवासाची किंवा भाषणांची आवड नव्हती.

फोर्डने डिवचले अन् कंपनीचे अधिग्रहण केले

1998 मध्ये टाटा मोटर्सने ‘इंडिका’ कार बाजारात आणली. परंतु ती अयशस्वी ठरली. यामुळे रतन टाटा यांनी फोर्ड मोटर कंपनीला ती विकण्याचा निर्णय घेतला. जेव्हा रतन टाटा यांनी बिल फोर्डला याबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला या व्यवसायाची पुरेशी माहिती नसताना या क्षेत्रात का आले. इंडिका त्यांनी घेतली तर ते मोठे उपकार करतील, या आशायने फोर्ड टाटांशी बोलले. त्यामुळे रतन टाटा नाराज झाले आणि त्यांनी बैठक सोडून दिली. मग एका दशकानंतर परिस्थिती बदलली. 2008 मध्ये फोर्ड कंपनी आर्थिक संकटात आली. तिने त्यांचे ब्रिटीश लक्झरी ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हर विकण्याचा निर्णय घेतला. मग बिल फोर्डने कबूल केले भारतीय कंपनीने या कंपन्या घेतल्या तर त्यांच्यावर खूप उपकार होतील. रतन टाटा यांनी हे दोन प्रसिद्ध ब्रँड US$2.3 बिलियनमध्ये विकत घेतले.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.