Flipkart Sale 2025: फ्लिपकार्टवर होणार सेल, ‘या’ उत्पादनांवर मिळेल बंपर डिस्काउंट
ग्राहकांसाठी पुढील आठवड्यापासून फ्लिपकार्टवर सेल सुरू होणार आहे, सेल दरम्यान तुम्हाला कोणते प्रॉडक्ट स्वस्तात मिळतील? आज आम्ही तुम्हाला सेल दरम्यान प्रॉडक्ट सवलतींव्यतिरिक्त अतिरिक्त सवलती कशा मिळवू शकता याबद्दल माहिती देणार आहोत? चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात...

तुम्हीही घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहात अशातच तुम्हीही एखाद्या बंपर सेलची देखील वाट पाहत आहात का? तर तुमची वाट लवकरच संपणार आहे. कारण तुमच्यासाठी पुढील आठवड्यापासून फ्लिपकार्टवर SASA LELE सेल सुरू होणार आहे. त्यात या सेलतमध्ये तुम्हाला मोबाईल फोनपासून ते घरगुती उपकरणांपर्यंत सर्व गोष्टींवर मोठी सूट मिळणार आहे. तर आजच्या लेखात आपणा जाणून घेणार आहोत की हा सेल पुढील आठवड्यात कोणत्या दिवशी सेल सुरू होईल आणि कोणत्या प्रॉडक्टवर तुम्हाला सवलतीचा फायदा मिळेल.
Flipkart SASA LELE Sale: सेल कधी सुरू होईल?
फ्लिपकार्ट सेल पुढील आठवड्यात 2 मे 2025 रोजी सुरू होईल, परंतु फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी हा सेल 24 तास आधी सुरू होईल. सेल दरम्यान प्रॉडक्टवर सूट असेल, परंतु जर तुम्हाला सेल दरम्यान अतिरिक्त बचत करायची असेल तर तुम्ही यासाठी बँक कार्ड डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता.
अशा प्रकारे तुम्हाला मिळेल अतिरिक्त सूट
फ्लिपकार्टने या सेलसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाशी हातमिळवणी केली आहे, एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% त्वरित सूट उपलब्ध होणार आहे. तसेच या सवलतीचा फायदा पूर्ण पेमेंट आणि ईएमआय व्यवहारांवर उपलब्ध असेल. सेल दरम्यान ग्राहकांना एक्सचेंज डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देखील मिळेल.
फ्लिपकार्ट सेलमध्ये प्रॉडक्टवर ऑफर्सचा बंपर फायदा
फ्लिपकार्टच्या या सेल दरम्यान तुम्ही ब्लॉकबस्टर डील्स, बाय 1 गेट 1 डिस्काउंट डील्स, जॅकपॉट डील्स, डबल डिस्काउंट आणि टिकटॉक डील्सचा लाभ घेऊ शकाल. सध्या कंपनीने कोणत्या प्रॉडक्टवर किती सूट देणार आहेत याबद्दल कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.
या उत्पादनांवर सवलत उपलब्ध असेल
विक्रीसाठी तयार केलेल्या मायक्रोसाईटवरून ग्राहकांना मोबाईल, लॅपटॉप, घरगुती उपकरणे, स्मार्ट गॅझेट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर सवलतीचा लाभ दिला जाणार असल्याचे समोर आले आहे. या उत्पादनांवर किती टक्के सूट असेल किंवा किती सूट मिळेल, हे अद्याप उघड झालेले नाही.
