छोटा पॅकेट, मोठी डोकेदुखी! ‘स्मॉल पॅक’वर मोठी भाववाढ, वाढत्या महागाईमुळे कंपन्यांचाही नाईलाज

छोटा पॅकेट, मोठी डोकेदुखी! 'स्मॉल पॅक'वर मोठी भाववाढ, वाढत्या महागाईमुळे कंपन्यांचाही नाईलाज
Image Credit source: TV9

कंपन्यांनी या छोट्या पॅकमधील येणाऱ्या वस्तूंचे प्रमाण कमी केले आहे. विशेषतः 2 ते 10 रुपयांच्या पॅकमध्ये हा बदल दिसून येणार आहे. आता या पॅकमध्ये स्नॅक्स कमी असेल पण किंमत तशीच ठेवण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 14, 2022 | 12:06 PM

छोटी खरेदी तुम्हाला भूर्दंड देणारी ठरणार आहे. छोटा पॅकेट, मोठी डोकेदुखी असा अनुभव ग्राहकांना येणार आहे. आता जेव्हा तुम्ही लिटल हार्ट्सचं बिस्किट 10 रुपयांना खरेदी कराल तेव्हा त्यात तुम्हाला दोन-तीन बिस्किटं कमी मिळतील, मात्र किंमत तीच असेल. वाढत्या महागाईमुळे ग्राहकांना हा फटका बसणार आहे. 2 रुपयांपासून ते 10 रुपयांपर्यंतच्या पॅकमध्ये आता तुम्हाला कमी वस्तू (small Pack) मिळणार आहे. एफएमसीजी कंपन्यांनी (FMCG) या पॅकचे वजन कमी केले आहे. त्यामुळे वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी कंपन्यांनी किंमत न वाढवता तुमच्या जीभेच्या आवडत्या वस्तू कमी केल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून तुमच्या स्वयंपाकघरात फार पूर्वी धडकलेली महागाईचा आता स्नॅक्स, बिस्कीट अशा सामान्य वापराच्या वस्तूंनाही फटका बसला आहे. गहू महाग झाला आहे, त्यामुळे पिठाचे भावही वाढले आहेत. खाद्यतेल, साखर यासारख्या वस्तू आधीच भडकलेल्या आहेत. या कच्च्या मालापासून स्नॅक्स, बिस्किटे ( snacks and biscuits) बनवली जातात. त्यामुळे कंपन्यांनी महागाईचा हा मोर्चा स्वतःकडून ग्राहकांकडे वळवला आहे.

लहान पॅकचे वजन आता कमी

आता कंपन्यांनी या लहान पॅकमध्ये येणाऱ्या वस्तूंचं प्रमाण कमी केले आहे. विशेषतः 2 ते 10 रुपयांच्या पॅकमध्ये हा बदल करण्यात आला आहे. आता या पॅकचे वजन कमी करून किंमतही तशीच ठेवण्यात आली आहे. पार्ले आणि ब्रिटानियासारख्या कंपन्यांच्या एकूण विक्रीत 2 ते 10 रुपये किंमतीच्या छोट्या पॅक म्हणजेच उत्पादनांचा वाटा सुमारे 50 टक्के आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पार्लेजीने 10 रुपयांपर्यंतच्या पॅकच्या किंमतीत गुपचूप 7 ते 8 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. अमूलच्या ताका बाबतीतही असंच झालंय. 10 रुपयांचा पॅकमध्ये आता ताक कमी मिळत आहे. 10-12 रुपयांचा नूडल्सचा पॅक तुम्हाला अगदीच लहान भासेल अथवा त्याच्या किंमतीत ही वाढ होऊ शकते. 10 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या पॅकच्या कंपन्यांनी थेट किंमती वाढवल्या आहेत. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने हा फटका ग्राहकांच्या माथी बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्चच्या तिमाहीत साखरेच्या दरात सुमारे 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गव्हाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

छोट्या पॅकची मोठी विक्री

कमी उत्पादन आणि खर्चात झालेली वाढ यामुळे दरवाढ झाली आहे. लागलीच सहज तयार होणाऱ्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांचे हात-पाय वाकडे झाले आहेत. परिस्थिती अशी आहे की, 5 रुपयांचा पॅक बंद होऊ शकतो. पूर्वी 5 रुपयांत मिळणारा पॅक आता 10 रुपयांना मिळू लागला आहे. कंपन्याही घाबरल्या आहेत. सूर्या फूड अँड अॅग्रोचा 70 टक्के पोर्टफोलिओ 5-10 रुपयांच्या घरात आहे. कारण खेड्यापाड्यात स्वस्त पॅक मोठ्या प्रमाणात विकले जातात. आधीच मंदावलेल्या मागणीच्या युगात महागाई ही कंपन्या आणि ग्राहक या दोघांसाठीही मोठी समस्या असल्याचे दिसून येत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें