AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Free Train Journey:  काय सांगता,  खासदारांच्या फुकट प्रवासासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 5 वर्षात मोफत रेल्वे प्रवासावर 64 कोटींचा खर्च

Crore Spend over MP Rail Journey: एकीकडे फुकट्या प्रवाशांवर दातओठ खात कारवाईचा आसूड उगवणा-या रेल्वे खात्याची खासदारांच्या फुकट प्रवासावर मात्र दातखिळी बसली आहे. देशातील खासदार आणि माजी खासदारांनी गेल्या पाच वर्षांत मोफत रेल्वे प्रवासाचा भरपूर फायदा उचलला आहे. त्यांच्या मोफत रेल्वे प्रवासावर 62 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

Free Train Journey:  काय सांगता,  खासदारांच्या फुकट प्रवासासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 5 वर्षात मोफत रेल्वे प्रवासावर 64 कोटींचा खर्च
मोफत रेल्वे प्रवासावर खासदारांची मज्जाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 01, 2022 | 1:02 PM
Share

देशातील वर्तमान खासदारांसोबतच माजी खासदारांच्या (MPs and Former MPs) आवोभगतीसाठी केंद्र सरकारने कोट्यवधींचा चुरडा केल्याचे समोर आले आहे. खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासासाठी (free train journey)थोडे थोडके नव्हे तर तब्बल 62 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांत ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. म्हणजेच संसदेच्या सदस्यांनी (Member of Parliament) देशभरात केलेल्या मोफत प्रवासासाठी केंद्र सरकारने 62 कोटी रुपये मोजले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतू,ज्या कोरोना काळात देश लॉकडाऊनमध्ये होता, त्या काळातही खासदार महाशयांनी मोफत रेल्वे प्रवास केला आहे. या सुविधाचा खासदारांनी दणकावून फायदा उठवला आहे. माहिती अधिकार कायद्याचा (Right to Information) वापर करत ही माहिती उघड झाली आहे. एकीकडे फुकट्या प्रवाशांवर दातओठ खात कारवाईचा आसूड उगवणा-या रेल्वे खात्याने मात्र या सुविधेवर कसलीच ओरड केलेली नाही. 2020-21 या काळात खासदारांनी जवळपास 2.5 कोटी रुपयांचा मोफत रेल्वे प्रवास केला आहे.

फर्स्ट क्लास मोफत प्रवास

नियमानुसार, संसद सदस्यांना रेल्वेत फर्स्ट क्लास सोबतच एक्झिकिटिव्ह क्लास चा मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येते. एवढे नाही तर, खासदारांचा जीवनसाथी पती अथवा पत्नी यांना काही अटींवर मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा देण्यात येते. सध्याच्या खासदारांसोबतच संसदेचे माजी सदस्य असलेल्या माजी खासदारांनाही मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा देण्यात येते. एका सहका-यासोबत माजी खासदाराला सेंकड क्लास एसी डब्ब्याचा रेल्वे प्रवास मोफत असतो. माजी खासदार एकट्यानेच प्रवास करत असतील तर त्यांना फर्स्ट क्लास एसीचा मोफत प्रवासाची मुभा देण्यात येते.

RTI मध्ये मोफत प्रवासाची माहिती

मध्यप्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात खासदारांच्या रेल्वे प्रवासाविषयी माहिती मागितली होती. लोकसभा सचिवालयाने त्यांना आरटीआय अंतर्गत ही माहिती दिली आहे. त्यात सध्याच्या खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासावर 35.21 कोटी तर माजी खासदारांच्या रेल्वे प्रवासासाठी 26.82 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती दिली. हा सर्व खर्च 2017 ते 2022 या कालावधीत करण्यात आला आहे. 2020-21 या काळात देश कोरोनाशी दोन हात करण्यात गुंतलेला असताना खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासावर या काळात 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये सध्याच्या खासदारांच्या मोफत प्रवासावर 1.29 कोटी तर माजी खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासावर 1.8 कोटी रुपयांचे बिल आले.

ज्येष्ठ नागरिकांची सवलत मात्र काढली

एकीकडे खासदारांच्या मोफत प्रवासावर कोट्यवधींची उधळपट्टी करणा-या सरकारने वरिष्ठ नागरिकांना तिकीट दरात दिलेली सवलत मात्र काढलेली आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ही सवलत बंद करण्यात आली होती. 20 मार्च 2022 ते 31 मार्च 2022 या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवाशी भाड्यात देण्यात येणारी सूट बंद केल्याने सरकारला 7.31 कोटींचा फायदा झाला होता.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.