Amazon सोबत पैसे कमवण्याची संधी, फक्त 4 तास काम करून महिन्याला कमवा 70 हजार

Amazon सोबत पैसे कमवण्याची संधी, फक्त 4 तास काम करून महिन्याला कमवा 70 हजार
अ‍ॅमेझॉन जॉब तुम्हाला नोकरीसोबत कमी वेळेत जास्त नफा मिळवण्याची संधी देत आहे. फक्त 4 तास काम करून तुम्ही दरमहा 70 हजारांपर्यंत कमवू शकता.

अ‍ॅमेझॉनने त्यांच्या कंपनीसह तब्बल 20 हजार लोकांना जोडण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला नोकरीसाठी त्रास घेण्याची गरज नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 07, 2020 | 1:29 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटकाळात (Corona Pandemic) तुम्हीही नोकरीच्या (Jobs) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनमध्ये (Amazon) नोकरीची एक चांगली संधी आहे. अ‍ॅमेझॉनने त्यांच्या कंपनीसह तब्बल 20 हजार लोकांना जोडण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला नोकरीसाठी त्रास घेण्याची गरज नाही. अ‍ॅमेझॉन जॉब तुम्हाला नोकरीसोबत कमी वेळेत जास्त नफा मिळवण्याची संधी देत आहे. फक्त 4 तास काम करून तुम्ही दरमहा 70 हजारांपर्यंत कमवू शकता. (get amazon job and earn upto 70000 rupees per month)

स्वतःच्या शहरात मिळवू शकता नोकरी अ‍ॅमेझॉन एक डिलिव्हरी बॉयसाठी नोकरीची संधी देत आहे. ज्यातून तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. बर्‍याच शहरांमध्ये या कंपनीचे सेंटर्स आहेत. त्यामुळे नोकरीसाठी तुम्हाला दुसऱ्या शहरात जाण्याची गरज नाही.

असं करा अप्लाय डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी तुम्ही थेट अ‍ॅमेझॉनच्या साइट https://logolog.amazon.in/applynow वर अर्ज करू शकता. किंवा कोणत्याही सेंटरमध्ये जाऊ शकता.

किती तास करावं लागेल काम ? डिलिव्हरी बॉयला दिवसभर काम करावं लागत नाही, त्यांना फक्त त्यांच्या क्षेत्रानुसार पॅकेजेस दिली जातात. डिलिव्हरी बॉय दिवसातून फक्त 4 तासात 100-150 पॅकेज डिलीव्हरी करतात.

या सर्व गोष्टींची असेल आवश्यकता डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. शाळा किंवा महाविद्यालयातील पासिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे. डिलिव्हरीसाठी तुमच्याकडे स्वतःची बाईक किंवा स्कूटर असली पाहिजे. इतकंच नाही तर दुचाकी किंवा स्कूटरचा विमा, आरसी हे वैध असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सदेखील असलं पाहिजे.

किती मिळणार पगार? डिलिव्हरी बॉयला कंपनीप्रमाणे दरमहा पगार दिला जातो. कंपनी त्याच्या डिलिव्हरी बॉयला 12 ते 15 हजार रुपयांपर्यंत पगार देते. यात पेट्रोलची किंमत तुमची स्वतःची आहे. प्रत्येक प्रोडक्टसाठी किंवा पॅकेजला 15 ते 20 रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही एका महिन्यासाठी काम करत असाल आणि दररोज 100 पॅकेजेस डिलिव्हरी केले तर तुम्ही सहज महिन्यात 60000 ते 70000 रुपये कमवू शकता.

इतर बातम्या – 

नोकरी गमावलेल्यांसाठी मोठी घोषणा, 15 हजारांखालील बेरोजगारांना PF चा लाभ; निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा

पोस्टात 634 पदांसाठी भरती; 10वी पास असलेल्यांना नोकरीची सुवर्णसंधी

(get amazon job and earn upto 70000 rupees per month)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें