नोकरी गमावलेल्यांसाठी मोठी घोषणा, 15 हजारांखालील बेरोजगारांना PF चा लाभ; निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा

कोरोनामुळे ब्रेक रोजगाराला मुकावे लागलेल्यांना पुन्हा सक्षमपणे उभं करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.(Finance Minister Nirmala Sitharaman Address Press Conference)

नोकरी गमावलेल्यांसाठी मोठी घोषणा, 15 हजारांखालील बेरोजगारांना PF चा लाभ; निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 2:29 PM

नवी दिल्ली: कोरोनामुळे नोकरी गमवावी लागलेल्यांना पुन्हा सक्षमपणे उभं करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’ अंतर्गत ज्यांनी पीएफसाठी नोंदणी केली नाही आणि ज्यांचा पगार 15 हजारापेक्षा कमी आहे, तसेच कोरोना काळात ज्यांची नोकरी गेली आहे, अशा बेरोजगारांना ईपीएफओअंतर्गत आणून त्यांना पीएफचा लाभ देण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. सीतारमण यांच्या या घोषणेमुळे संघटित क्षेत्रातील कामगारांना मोठा लाभ मिळणार आहे. (Finance Minister Nirmala Sitharaman Address Press Conference)

देशात आर्थिक मंदीचं सावट घोंघावत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचं विवरण मांडलं. तसेच सध्याच्या आकडेवारीवरून देशातील अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. कोरोना महामारीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे संघटित क्षेत्राला मजबूत करण्यात येणार आहे. तसेच ईपीएफओशी संलग्न होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. सरकारच्या या नव्या योजनेनुसार ज्यांनी ईपीएफओमध्ये नोंदणी केली नाही. मात्र 1 मार्च 2020 ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान ज्यांची नोकरी गेली आहे आणि ज्यांचा पगार 15 हजाराचा आत आहे, अशा बेरोजगारांना पीएफचा लाभ देण्यात येणार आहे. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू होणार असून 30 जून 2021 पर्यंत लागू राहणार आहे, असं सीतारमण यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारत रोजगार योजने अंतर्गत आतापर्यंत 1.59 लाख संस्थांना 8300 कोटी रुपयांचं सहाय्य करण्यात आलं आहे. यात 1 कोटी 21 लाखांपेक्षा अधिक लोकांना लाभ झाला आहे.

जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी ईपीएफओची नोंदणी करावी आणि पीएफचा फायदा घ्यावा हा योजनेचा हेतू आहे. ज्यांनी पीएफसाठी नोंदणी केली नाही आणि ज्यांचा पगार 15 हजारापेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्याला या नव्या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या कंपन्यांमधील कामगारांची संख्या एक हजारापर्यंत आहे. अशा कंपन्यांनी नवीन कामगार भरती केल्यास. सरकार दोन वर्ष या नव्या कामगारांच्या पीएफचा संपूर्ण 24 टक्के हिस्सा सबसिडी म्हणून देणार आहे. 1 ऑक्टोबर 2020 पासून ही योजना लागू असणार आहे. तसेच एक हजारापेक्षा अधिक कामगार असलेल्या कंपन्यांनी नव्या कर्मचाऱ्यांची भरती केल्यास या नव्या कर्मचाऱ्यांच्या 12 टक्के पीएफवर सरकार 2 टक्के सबसिडी देणार आहे. या योजनेअंतर्गत 95 टक्के कंपन्या वा संस्था येणार असून त्यामुळे कोट्यवधी कामगारांना लाभ मिळणार आहे.

>> केंद्राने एमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीमची मुदत वाढवून 31 मार्च 2021 केली आहे. कोरोनाच्या संकटात MSME मध्ये सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून ही स्कीम लागू केली आहे.

>> एमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम अंतर्गत 61 लाख कर्जदारांना 2 लाख कोटीहून अधिक कर्ज वाटप करण्यात आलं आहे. यात 1.52 लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या:

FM Nirmala Sitharaman : केंद्राकडून मोठं दिवाळी गिफ्ट, ‘प्रोत्साहन’ पॅकेजची घोषणा

Nirmala Sitharaman | ‘वन नेशन वन रेशन कार्ड’योजनेचे 68.6 कोटी लाभार्धी : निर्मला सीतारमण

(Finance Minister Nirmala Sitharaman Address Press Conference)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.