Gold Price Today : सोन्याची महागाईची दवंडी; एका आठवड्यात इतक्या वाढल्या किंमती, 24K आणि 22K चा भाव काय?
Gold Price Today : सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात दोन्ही धातुनी कमाल दाखवली. अखेरच्या सत्रात मौल्यवान धातुत घसरण दिसली . या आठवड्यात किती वाढल्या किंमती?

गेल्या आठवड्यात जगभरातील बाजारपेठेत मोठा गोंधळ उडाला. सोन्याची चमक वाढली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव एका आठवड्यात 3920 रुपयांनी वाढला. आता 24 कॅरेट सोने 1,19,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 3600 रुपयांची वाढ दिसली. सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत वाढ, शेअर बाजारातील घसरण, अमेरिकेती शटडाऊनचे संकट, डॉलरचा आलेख उतरल्याचा परिणाम दिसून आला.
चांदीचा काय भाव?
सोन्याच्या किंमतीत उसळीसह चांदीतही तेजी दिसून आली. चांदीची किंमत किलोमागे 6 हजारांनी वाढली. 5 ऑक्टोबर 2025 रोजी चांदी 1,55,000 रुपये प्रति किलोवर पोहचल्या. सप्टेंबर महिन्यात चांदीने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. परताव्यात चांदीने सोन्याला मागे सोडले. या दरम्यान चांदीचा भाव 19.4 टक्क्यांनी वधारला. तर सोन्याच्या किंमतीत 13 टक्क्यांनी वाढ झाली.
चांदी गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरली आहे. औद्योगिक मागणी पण वाढली आहे. एकूण मागणीत 60-70 टक्क्यांचा वाटा हा औद्योगिक क्षेत्रातील आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि औद्योगिक वापराची मागणी पाहता चांदीच्या किंमतीत तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार चांदीला सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय म्हणून पाहत आहेत.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदी घसरले. 24 कॅरेट सोने 1,16,950 रुपये, 23 कॅरेट 1,16,449, 22 कॅरेट सोने 1,07,130 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 87,720 रुपये, 14 कॅरेट सोने 68,420 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,45,610 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
