AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सकाळीच आली गुड न्यूज! सोन्याच्या भावात आजही घसरण, 10 ग्रॅम सोनं आता…

Gold Price Today 21 April 2026 Latest News Updates in Marathi : सर्वांच्या जिव्हाळ्याच विषय असलेला धातू म्हणजे सोनं, त्यापाठोपाठ येते ती चांदी. गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही धातूंचे दर वरखाली होत असून कधी भाव गगनाला भिडतात, तर कधी धाडकन उतरणीला लागतात. 21 एप्रिलच्या सकाळी देशभरात 10 ग्रॅम सोन्याचे भाव किती आहेत माहीत आहे का ?

Gold Price Today : सकाळीच आली गुड न्यूज! सोन्याच्या भावात आजही घसरण, 10 ग्रॅम सोनं आता...
सोन्याची घसरगुंडीImage Credit source: social media
| Updated on: Apr 21, 2026 | 9:44 AM
Share

Gold Rate Today In India : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं स्थिर राहिल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी चकाकणारा धातू सोन्याची चमक फिकी पडली आहे. एक दिवस स्थिर राहिल्यानंतर, राजधानी दिल्लीत 10 ग्रॅमचं 24 कॅरेट सोने दोन दिवसांत 500 रुपयांनी आणि 22-कॅरेट सोने 460 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आजच्या दिवसाबद्दल बोलायचे झाल्यास, आज, 21 एप्रिलच्या सकाळी 24 कॅरेट आणि 22-कॅरेट दोन्ही सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 10 रुपयांची घट दिसून आली आहे. आणि चांदीबद्दल सांगायचं झाल्यास,दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर दिल्लीत चांदीही स्वस्त झाली असून, तिच्या प्रति किलो दरात 100 रुपयांची घट झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव

मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई व देशांतील इतर प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर किती ते जाणून घेऊया.

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम गोल्ड भाव  22 कॅरेट 10 ग्रॅम गोल्ड भाव  18 कॅरेट 10 ग्रॅम गोल्ड भाव 
दिल्ली ₹1,55,430 ₹1,42,490 ₹1,16,610
मुंबई ₹1,55,280 ₹1,42,340 ₹1,16,460
कोलकाता ₹1,55,280 ₹1,42,340 ₹1,16,460
चेन्नई ₹1,55,990 ₹1,42,990 ₹1,18,540
बंगळुरू ₹1,55,280 ₹1,42,340 ₹1,16,460
हैदराबाद ₹1,55,280 ₹1,42,340 ₹1,16,460
लखनऊ ₹1,55,430 ₹1,42,490 ₹1,16,610
पाटणा ₹1,55,330 ₹1,42,390 ₹1,16,510
जयपुर ₹1,55,430 ₹1,42,490 ₹1,16,610
अहमदाबाद ₹1,55,330 ₹1,42,390 ₹1,16,510

चांदीतही झाली घसरण

सोन्यानंतर आणखी एक चकाकणारा धातू, चांदीबद्दल बोलायचं झालं तर दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर आज चांदीचा भाव घसरला आहे. यापूर्वी 17 एप्रिल रोजी एक किलो चांदी 5000 रुपयांनी स्वस्त झाली होती आणि त्यानंतर 18 एप्रिल रोजी ती एकूण 10 हजार रुपयांनी महाग झाली. यानंतर रविवार 19 एप्रिल, म्हणजेच अक्षय्य तृतीयेला आणि त्यानंतरच्या दिवशीही भाव चांदीचे स्थिर राहिले. पण आजच्या दिवसाबद्दल बोलायचं झाल्यास, मंगळवारी दिल्लीत चांदी 100 रुपयांनी स्वस्त होऊन 2 लाख 74 हजार 900 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. इतर महत्त्वाच्या शहरांबद्दल सांगायचं झाल तर मुंबई आणि कोलकाता येथेही चांदी त्याच दराने विकली जात आहे. मात्र, चेन्नईमध्ये एक किलो चांदीचा भाव 2 लाख 79 हजार 900 रुपये आहे, म्हणजेच या चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग आहे.

पुढे कशी असेल सोन्या-चांदीच्या दरांची स्थिती ?

पश्चिम आशियातील तणाव काही अद्यापही शांत झालेला दिसत नाही. त्यामुळे वाढता तणाव आणि प्रमुख देशांमधील आर्थिक आकडेवारीवरून बाजारातील तेजी कायम राहील की किंचित मंदावेल, हे ठरेल. 20 एप्रिल रोजी सुरू झालेल्या या आठवड्यात, व्यापारी कच्च्या तेलाच्या किमती आणि किरकोळ विक्री, गृहनिर्माण आकडेवारी व कन्झ्युमर सेंटिमेंट यांसारख्या प्रमुख आकडेवारीवर विशेष बारकाईने लक्ष ठेवतील. याव्यतिरिक्त, अमेरिका आणि ब्रिटनमधील उत्पादन आणि सेवा क्षेत्रांची पीएमआय आकडेवारीदेखील बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. गुंतवणूक करण्याण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Follow Us
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!