दिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार

येणाऱ्या सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विमल गोयल याबाबत म्हणाले की, दिवाळीपर्यंत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत तब्बल 65 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, तर चांदीचा दर प्रति किलो 70-75 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. (Gold price will reach 65000 per 10 grams in diwali 2020)

विमल गोयल म्हणाले की, “कोरोना कालावधीत सोन्या-चांदीची चमक वाढली आहे. विशेषत: चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. अनलॉक -1 दरम्यान जेव्हा सुरुवातीला दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा व्यवसाय मंदित होता. पण आता घाऊक आणि किरकोळ बाजारात सुधारणा झाली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही दिवळीत सोन्याची मोठी विक्री होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, दिवाळीपर्यंत सोन्या-चांदीची किंमत काही प्रमाणात कमी-जास्त होत राहील”.

गोयल म्हणाले की, दिल्लीतल्या सराफा बाजारात सर्व व्यावसायिक कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करत आहेत. कोरोनामुळे बाजाराची अवस्था बिकट झाली होती. परंतु आता परिस्थिती सुधारत आहे. आता आमच्या आशा दिवाळीवर टिकून आहेत. दिवाळीत बाजार पुन्हा पूर्ववत होईल, अशी सर्व सराफा व्यावसायिकांना आशा आहे. तसेच याचा अर्थव्यवस्थेवरही चांगला परिणाम दिसून येईल.

सराफा बाजार विशेषज्ञ माधव म्हणाले की, सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीतह मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चांदीची किंमत प्रति किलो 70-75 हजार रुपये इतकी होईल. कोरोना कालावधीत सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये थोडीफार किंमत कमी झाली आहे. मात्र ती तात्पुरती असेल. आगामी कालावधीत सोनं अजून महागणार आहे.

सध्या सोन्याच्या किंमतीत घट होण्यापेक्षा वाढ होण्याचा रेट अधिक आहे. भाविष्यातही हाच ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही कालावाधीत मागणी कमी झाली होती. परंतु आता बाजारात झपाट्याने सुधारणा झाली आहे.

सध्याच्या घडीला सोन्याची किंमत का घटतेय?

जागतिक पातळीवर, डॉलरमधील रिकव्हरी आणि अमेरिकन मदत पॅकेजच्या अनिश्चिततेमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर प्रति औंस 0.1% घसरून ते 1,898.16 डॉलरवर बंद झाले. इतर मौल्यवान धातूंपैकी चांदी 0.3 टक्क्यांनी घसरून 24.43 डॉलर प्रति औंस आली आहे. प्लॅटिनम आणि पॅलेडियम 0.1% वाढून 857.85 डॉलर प्रति डॉलरवर पोहोचलं आहे.

अमेरिकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी काही अनुदानपर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते.

परंतु सोन्याच्या किंमतीत सुरु असलेली ही घसरण पुढील थांबेल आणि सोन्याच्या किंमतीत वाढ होईल, असे या क्षेत्रातील अभ्यासक सांगत आहेत.

संबंधित बातम्या

25 हजारांपर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी मोठी बातमी, अवघ्या 25 रुपयांत सरकार शिक्षण देण्यासह लग्नही लावून देणार!

5 आणि 10 रुपयांची ही नाणी बनवतील श्रीमंत; 10 लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी

Big offer : 4 % हून कमी व्याजदरात मिळणार गृह कर्ज, 25 हजार ते 8 लाखांपर्यत व्हाऊचर

ऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलले, आता ग्राहक झाले पॉवरफुल्ल (Gold price will reach 65000 per 10 grams in diwali 2020)

Published On - 4:35 pm, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI