Gold Rate | सोने दराची घोडदौड, सोन्याचं अर्धशतक, GST सह सोन्याचा भाव...

कोरोनाच्या काळातही देशभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे (Latest Gold rate in Mumbai Maharashtra India).

Gold Rate | सोने दराची घोडदौड, सोन्याचं अर्धशतक, GST सह सोन्याचा भाव...

मुंबई : कोरोनाच्या काळातही देशभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे (Latest Gold rate in Mumbai Maharashtra India). मुंबईतही सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली. यासह आता मुंबईत सोन्याचे दर 50 हजार पार गेले आहेत. जीएसटीसह मुंबईत प्रतितोळा सोनं 50,372 रुपये किंमत झाली आहे. तसेच चांदीचे दर प्रतिकिलो 52,400 रुपये इतके झाले आहेत.

मागील दोन आठवड्यापासून सोन्याच्या दरात विलक्षण वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही वाढ होत असल्याने यामागील कारणांचं देखील विश्लेषण होतंय. मात्र, वाढत्या सोन्याच्या किमतीमुळे सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचीही चिंता वाढली आहे.

दरम्यान, घरेलू सराफ बाजारात शुक्रवारी (10 जुलै) सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होताना दिसली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार नवी दिल्लीत शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 8 रुपयांची वाढ झाली. यासह दिल्लीतील सोन्याचे दर 49,959 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोन्याच्या दरातील ही वाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारांमुळे झाल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. याआधी मागील सत्रात गुरुवारी सोन्याचे दर 49,951 रुपये प्रति 10 ग्रॅम असताना बाजार बंद झाला होता.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

चांदीच्या किमतीत मात्र घट झालेली दिसली. घरेलू सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी चांदीचे दर 352 रुपये प्रति किलोग्रॅमने कमी झाले. या घसरणीसह चांदीचे दर 52 हजार 364 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. गुरुवारी चांदीचे दर 52,716 रुपये प्रति किलो होते.

दरम्यान, जळगावात 2 जुलै रोजी सोन्याच्या भावाने 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता (Gold rate in jalgaon increasing fastly). गुरुवारी सकाळी सराफ बाजार उघडला तेव्हापासून सोन्याचे भाव (जीएसटीसह) 51 हजार 500 रुपये इतके होते. येत्या आठवडाभरात सोन्याचे भाव 53 हजार रुपये प्रतितोळा असतील, असा अंदाजही सराफ व्यावसायिकांनी वर्तवला होता. जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचं बोललं जात आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सराफ बाजारातील उलाढाल ठप्प झाली होती. परंतु कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरु असल्याने सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहचले होते. लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता देण्यात आल्यानंतर सराफ बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरु झाल्यानंतरही कायम आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.

लग्नसराई देखील काही प्रमाणात सुरु झाल्याने सोने चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दुसरीकडे सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने गुंतवणूकदार देखील खरेदीकडे वळले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्थेत असलेली अस्थिरता देखील सोन्याचे भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

हेही वाचा :

Sovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने खरेदीचा पर्याय, सरकारी गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकीची संधी

Gold rate | जळगावात सोन्याचा भाव 53 हजाराच्या दिशेने

तोळ्याने विकणाऱ्यावर किलोने विकण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे सोनार बनला कांदा व्यापारी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *