Gold rate Today | सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण! उतरत्या भावातही कमाईची जबरदस्त संधी

अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये सतत वाढ होत असताना, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावावर दबाव दिसून येत आहेत. सध्या, सोने 46200च्या पातळीवर ट्रेड करत आहे.

Gold rate Today | सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण! उतरत्या भावातही कमाईची जबरदस्त संधी
सोन्याच्या रोखेची परिपक्वता 8 वर्षे असते. मॅच्युरिटीच्या वेळी रिडीम कराल तेव्हा तुम्हाला मिळणाऱ्या नफ्यावर कोणताही कर नाही. जर बाँड विकायचा असेल तर त्याची मुदत 5 वर्षे निश्चित केली जाईल. म्हणजेच आपण 5 वर्षांनंतरच बाँडची विक्री करू शकता. या कालावधीत बाँड अल्प कालावधीत विकले जातात आणि त्यावर नफा फिजिकल सोन्याप्रमाणे आकारला जातो.
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 12:40 PM

मुंबई : अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये सतत वाढ होत असताना, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावावर दबाव दिसून येत आहेत. सध्या, सोने 46200च्या पातळीवर ट्रेड करत आहे. सकाळी 10.30 वाजता, एप्रिल डिलीव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 19 रुपयांनी घसरून 46222 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर ट्रेड करत होता. तर, त्याचप्रमाणे जून डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 24 रुपयांनी घसरून 46371 रुपयांवर ट्रेड करत होता (Gold rate today 26 February price down best opportunity for gold investment).

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरावर मोठा दबाव दिसत आहे. यावेळी, एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 9.65 डॉलर घसरणीसह (-0.54%) 1,765.75वर ट्रेड करत होता. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास मार्च डिलिव्हरीसाठी चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात -0.35 (-1.27%) च्या घसरणीसह प्रति औंस 27.28 डॉलरवर व्यापार करत आहे. एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम आहे. MCXवर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव सध्या 68722 रुपये प्रतिकिलोवर आहे, तर मे डिलिव्हरीची चांदी 602 रुपयांनी घसरण होऊन 70074 रुपयांवर ट्रेड करत आहे.

सराफा बाजारात सोन्याची घसरण

जागतिक बाजारपेठेतील विक्रीच्या व्यवसायात राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमती 358 रुपयांनी घसरून 45,959 रुपयांवर आल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. आधीच्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 46,313 रुपयांवर बंद झाले होते. सोन्याचे भाव खाली आले आहेत, तर चांदी महाग झाली. चांदीचा भाव 151 रुपयांनी वाढून 69,159 रुपये झाला आहे. ज्याचा मागील बंद भाव 69,008 किलो होता (Gold rate today 26 February price down best opportunity for gold investment).

सोने 56500च्या पातळीवर पोहोचू शकते!

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या ​​कमोडिटी रिसर्चच्या नवनीत दमानी यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सध्या 1800 डॉलर्सने भक्कम स्थानावर आहे. मीडियम टर्ममध्ये हे  2150 डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्या म्हणाले की, आयात शुल्कामध्ये 5% कपात केल्यामुळे सोन्याच्या किंमतीतही घसरण दिसून येत आहे. परंतु, येत्या 6-12 महिन्यांत ती 56500 किंवा त्याहून अधिक वर जाऊ शकते. कमोडिटी मार्केटचे तज्ज्ञ अजूनही म्हणतात की, सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होईल, म्हणून ही गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे.

अमेरिकन बेंचमार्क बाँड यील्डमधील तेजीमुळे सोन्याचे दर पडले फिके!

मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात पर्यायी गुंतवणुकीचे वरिष्ठ फंड मॅनेजर चिराग मेहता यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या बाँड यील्डमधील वाढीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झालेली दिसून येते. ऑगस्ट 2020मध्ये अमेरिकेच्या दहा वर्षांच्या बेंचमार्क बाँडचे उत्पन्न 0.60 टक्के होते, जे आता वाढून 1.37 टक्क्यांवर गेले आहे. चिराग म्हणतात की, अमेरिकन फेडरलला हे यील्ड वाढावे, असे वाटत नसेल. अर्थव्यवस्थेत पुन्हा सुधार येण्यासाठी बाँड यील्डमध्ये उतार होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व अशी उपाययोजना करेल, ज्यामुळे हे यील्ड कमी होईल आणि नंतर सोन्याला पुन्हा एकदा झळाळी येईल. यील्ड म्हणजे व्याज दर.

(टीप : गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Gold rate today 26 February price down best opportunity for gold investment)

हेही वाचा :

AXIS ची जबरदस्त योजना : 3 महिन्यांत एफडीचा डबल फायदा, 1000 रुपये महिन्याने 10 वर्षांत 27 लाखांची कमाई!

LPG Cylinder Price: गृहिणींचं बजेट कोलमडणार; गॅस सिलिंडरच्या किमतीत एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ; पटापट तपासा

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.