Gold Rate Today: सोने, चांदीच्या किमतीत वाढ; तोळ्याचा भाव काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,794 डॉलर प्रति औंस होती. चांदी 24.35 प्रति औंस डॉलरवर स्थिर राहिली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सोने महागले. ते शुक्रवारी अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढून 1,794 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. कमकुवत डॉलरनेही त्याला समर्थन दिले.

Gold Rate Today: सोने, चांदीच्या किमतीत वाढ; तोळ्याचा भाव काय?
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 5:43 PM

नवी दिल्लीः Gold Silver Price Today : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शुक्रवारी सोन्याचे दर 158 रुपयांनी वाढून 46,678 रुपये प्रति 10 ग्रॅम झालेत. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती मजबूत झाल्यामुळे हे घडले. मागील व्यापारात मौल्यवान धातूचे सोने प्रति 10 ग्रॅम 46,520 रुपयांवर बंद झाले होते. चांदी देखील 180 रुपयांनी वाढून 64,210 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापारात ती 64,030 रुपये प्रति किलो होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,794 डॉलर प्रति औंस होती. चांदी 24.35 प्रति औंस डॉलरवर स्थिर राहिली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सोने महागले. ते शुक्रवारी अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढून 1,794 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. कमकुवत डॉलरनेही त्याला समर्थन दिले.

सोन्याची किंमत 57 हजारांपासून 60 हजारांपर्यंत जाणार

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅम पर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात.

भारतात गोल्ड एक्सचेंज उभारणार

बाजार नियामक सेबीने बुधवारी गोल्ड एक्सचेंज उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) अर्थात ईजीआरद्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की, ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय व्यासपीठ असेल. ईजीआरअंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.

संबंधित बातम्या

खूशखबर! धनत्रयोदशीला फक्त 1 रुपयात खरेदी करा सोने, जाणून घ्या मार्ग कोणता?

‘या’ NBFC मध्ये FD खाते उघडल्यास 6.5%पर्यंत व्याज मिळणार, क्रेडिट रेटिंगदेखील सर्वोत्तम

Gold Rate Today: Gold, silver prices rise 22 october 2021; What is the gold price of tola?

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.