AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate: सोने स्वस्त होणार की आणखी महागणार? सणासुदीच्या काळात कसा असेल दर?

आगामी काळात दसरा, दिवाळी हे सण आहेत, या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या काळात सोन्याचे दर नेमके कसे असतील? आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे सध्याचे दर काय आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Gold Rate: सोने स्वस्त होणार की आणखी महागणार? सणासुदीच्या काळात कसा असेल दर?
Gold rate news
| Updated on: Sep 21, 2025 | 10:41 PM
Share

गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. भारतात सध्या सोन्याचे दर 1 लाख दहा हजारांवर पोहोचला आहे. आगामी काळात दसरा-दिवाळी हे सण आहेत, या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या काळात सोन्याचे दर नेमके कसे असतील? आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे सध्याचे दर काय आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार सोमवारपासून सुरु होत असलेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. जगभरातील ढिसाळ आर्थिक धोरणे, सणांच्या काळात सोन्याची वाढती मागणी, मध्यवर्ती बँकांकडून सतत खरेदी या कारणांमुळे सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विश्लेषकांच्या मते, अनेक व्यापारी अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराच्या चर्चेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, तसेच अमेरिका आणि चीनमधील चर्चा देखील महत्त्वाची असेल. यावरून सोन्याची किंमत ठरणार आहे.

तज्ञांचे मत काय आहे?

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसमधील कमोडिटी आणि करन्सी रिसर्चचे उपाध्यक्ष प्रणव मीर यांनी सांगितले की, ‘आशियातील सणासुदीच्या मागणीमुळे सोन्याची किंमत आणखी वाढेल. ईटीएफ आणि मध्यवर्ती बँका खरेदीदार राहतील. असं असलं तरी सध्यागुंतवणूकदारांची खरेदी थोडी कमकुवत असल्याचे दिसून येत आहे.

भारतातील दर काय आहे?

गेल्या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा 1616 रुपयांनी किंवा सुमारे 1.5% ने वाढून 1,09,900 रुपये प्रति तोळा वर ​​बंद झाला. गेल्या आठवड्याच्या मध्यात सोन्याचे भाव घसरले होते मात्र कालांतराने ते पूर्व पदावर आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात परिस्थिती काय आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारतही सोन्याच्या किमती वाढताना दिसत आहेत. गेल्या बुधवारी सोन्याचा वायदा 3744 डॉलर प्रति औंस या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होकी. मात्र शनिवारी तो किंचित घसरून 3705.80 डॉलर प्रति औंसवर बंद झाला.

आगामी काळात कसा असेल दर?

तज्ज्ञांच्या मतानुसार सणासुदीच्या हंगामामुळे सोन्याच्या दरात तेजी राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार सोने हे सुरक्षित गुंतवणूक मानून खरेदी सुरू ठेवू शकतात. त्यामुळे आगामी आठवड्यातही सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.