Gold rate today : शेअर मार्केटमुळे सोनं-चांदी वधारली, वाचा काय आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव

MCX वर डिलिव्हरीसाठी आलेल्या सोन्याचा वायदा भाव आज सकाळी 11.50 वाजता 66 रुपयांच्या तेजीसह 47384 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता.

Gold rate today : शेअर मार्केटमुळे सोनं-चांदी वधारली, वाचा काय आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 3:05 PM

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात उसळी (Share market today) आल्यानंतर आज सोन्या-चांदीच्या भावांमध्येही (Gold Silver rate) तेजी आल्याचं पाहायला मिळालं. MCX वर डिलिव्हरीसाठी आलेल्या सोन्याचा वायदा भाव आज सकाळी 11.50 वाजता 66 रुपयांच्या तेजीसह 47384 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता. इतकंच नाहीतर चांदीही आज वधारली आहे. मार्च डिलिव्हरीची चांदी (Silver rate) सध्या 834 रुपयांच्या तेजीसह 69951 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. तर मे महिन्यात डिलिव्हरीसाठी असलेली चांदी 888 रुपयांच्या तेजीसह 71083 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. (gold silver price today 15 february business news buyers dominating share market as well)

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमतींचा (Gold international rate) विचार केला तर एप्रिल डिलिव्हरीचं सोनं 3.00 डॉलरच्या घसरणीसह 1,820.20 डॉलर प्रति औंस बाजार करत आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांदी (Silver international rate) मात्र वधारल्याचं दिसून आलं. कारण, मार्च डिलिव्हरीची चांदी 0.28 डॉलरच्या तेजीसह 27.60 डॉलर प्रति औंस व्यापार करत आहेत.

खरंतर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात (Gold Rate) चढउतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे, दुसरीकडे लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही परिणाम होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, गुंतवणूकदारही सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचे भावही मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

दर वाढले तरी सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही

सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. (gold silver price today 15 february business news buyers dominating share market as well)

संबंधित बातम्या – 

Alert | नोकरदारांनो लक्ष द्या! EPFOमध्ये ‘ही’ कागदपत्र जमा करणे आवश्यक, अन्यथा व्याजाला मुकाल!

ना रोटेशनल शिफ्ट, ना टार्गेटचं टेन्शन! घरबसल्या सुरू करा ‘हा’ व्यवसाय, व्हाल लखपती

SBI कडून अलर्ट! नोकरीच्या शोधात एक चूक पडेल महागात, फसवणुकीपासून ‘असे’ राहा सावध

SBI, HDFC बँक, ICICI आणि BOB ची स्पेशल FD ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

(gold silver price today 15 february business news buyers dominating share market as well)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.