AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Gold Rates 18 February 2026 : रातोरात सोन्या चांदीबाबत मोठी घडामोड, अन् सकाळ होताच… ज्वेलरकडे जायचं की नाही? काय आहेत भाव ?

Gold-Silver Rate Today 18 February 2026 Latest News Updates in Marathi : मंगळवारी रात्रीपर्यंत सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या होत्या. हे मौल्यवान धातू केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही कोसळले. MCX वर चांदी अचानक 5 टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली होती. आज सकाळी बाजार सुरू झाल्यावर ...

Today Gold Rates 18 February 2026 : रातोरात सोन्या चांदीबाबत मोठी घडामोड, अन् सकाळ होताच... ज्वेलरकडे जायचं की नाही? काय आहेत भाव ?
सोनं-चांदीचे दर किती ?Image Credit source: tv9
| Updated on: Feb 18, 2026 | 10:24 AM
Share

Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण (Gold-Silver Price Crash) झाली आहे. मंगळवारी, MCX वरील सोनं आणि चांदीचे दर एका रात्रीत अचानक घसरले. रात्री 8.30 च्या सुमारास चांदी 5 टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली, तर सोन्याच्या किमतीतही सुमारे 2.5 टक्क्यांनी घट झाली. या घसरणीनंतर, आज म्हणजेच बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर(MCX) व्यवहार सुरू होताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती रिकव्हरी मोडमध्ये दिसून आल्या. आज 1 किलो चांदी आणि 10 ग्रॅम सोन्याचा दर किती आहे, ते जाणून घेऊया…

रात्री धाडकन आपटले सोनं-चांदीचे दर

सर्वात प्रथम चांदीच्या किमतींबद्दल जाणून घेऊ, जी मंगळवारी रात्री अचानक 5% पेक्षा जास्त घसरली. व्यापारा दरम्यान चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 2.26 लाखांच्या जवळपास पोहोचले होते. रात्रीच्या वेळी अपडेट केलेल्या दरांवर नजर टाकल्यास, MCX वर 5 मार्च रोजी एक्सपायरी असलेल्या चांदीच्या किमतीत 5.58 % किंवा 13 हजार 278 रुपये प्रति किलोने घट होऊन किंमत 2,26,513 रुपये झाली. याचा अर्थ असा की 29 जानेवारी रोजी चांदी 4,20,048 या लाईफ टाईम हायवर होती, तिथून दर 1,93,535 रुपयांनी घसरला. मात्र, काल यवहार बंद होताना तो चांदीचे दर 2,28,783 रुपयांवर पोहोचले

सकाळी MCX वर किती दर ?

मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर, आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारी एमसीएक्सवर कमोडिटी ट्रेडिंग सुरू होताच, चांदीच्या किमती रिकव्हरी मोडमध्ये दिसून आल्या. सकाळी 1 किलो चांदीचा भाव 2 टक्क्यांहून अधिक किंवा 5000 रुपयांपेक्षा जास्त वाढीसह 2 लाख 34 हजार रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता.

क्रॅशनंतर सोन्याचीही रिकव्हरी

चांदीनंतर, आता सोन्याच्या किमतीबद्दल जाणून, चांदीच्या किमतीप्रमाणेच, रात्रीच्या वेळी घसरणीनंतर हा मौल्यवान धातू रिकव्हरी मोडमध्ये (Gold Rate Up After Crash) दिसून आला. काल रात्री सुमारे 2.5 टक्क्यांनी घसरल्यानंतर, आज एमसीएक्सवर कारभार सुरू होता, सोनं हे 1 टक्क्यांहून अधिक वाढले.

काल रात्रीतून घसरण झाल्यानंतर, फ्युचर्स ट्रेडिंगच्या शेवटी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,51,418 रुपयांवर बंद झाला. तर आज, बुधवारी सकाळी बाजार सुरू होता, 2 एप्रिल रोजी एक्सपायरी असलेल्या या सोन्याची किंमत सुमारे 1.15 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी किंमत 1,53,165 रुपये झाली. ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसून आली.

सोन्याच्या उच्च दरात अलिकडेच वाढ झाली असूनही आतापर्यंत सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीबद्दल बोलायचे झाले तर, 29 जानेवारी रोजी चांदीप्रमाणेच सोन्याचा भावही प्रति 10 ग्रॅमसाठा 1 लाख 93 हजार 096 रुपयांच्याउच्चांकी पातळीवर होता. पण त्यानंतर सोन्याचे दर खाली घसरू लागले. एक-दोन दिवस वाढ झाल्यानंतरही, सोनं आता त्याच्या उच्चांकापेक्षा सुमारे 40 हजार रुपये प्रति ग्रॅमने स्वस्त झाले आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता