AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 16 May 2024 : ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, सोन्याने झटकली मरगळ, चांदीची भरारी, अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 16 May 2024 : या आठवड्यात सुरुवातीला सोन्यात घसरण झाली. आता सोन्याने मूड बदलला. सोने महागले. तर चांदीने या आठवड्यात जोरदार बॅटिंग केली.चांदीने चांगलीच मुसंडी मारली. सराफा बाजारात अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 16 May 2024 : ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, सोन्याने झटकली मरगळ, चांदीची भरारी, अशा आहेत किंमती
वधारले सोने आणि चांदी, काय आहेत किंमती
| Updated on: May 16, 2024 | 8:40 AM
Share

गेल्या आठवड्याप्रमाणेच सोने-चांदीत चढउताराचे सत्र आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात घसरण दिसली. तर चांदी महागली. आता मध्यंतरानंतर सोने वधारले आहे. सोन्याने मोठी उसळी घेतली नसली तरी घसरणीला ब्रेक लावला आहे. चांदी सोमवारपासून वधारली आहे. मे महिन्यातील 15 दिवस झाले आहेत. या काळात मार्च आणि एप्रिलसारखी दरवाढीची त्सुनामी आलेली नाही. मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र सुरु आहे. आता अशा आहेत बेशकिंमती धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 16 May 2024 )

सोने महागले

सोन्याने गेल्या आठवड्यात 10 मे रोजी जोरदार भरारी घेतली होती. या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला आहे. 13 मे रोजी सोने 100 रुपयांनी कमी झाले. त्यानंतर 14 मे रोजी किंमती 400 रुपयांनी उतरल्या. तर 15 मे रोजी त्यात तितकीच वाढ दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत एक हजाराची वाढ

गेल्या आठवड्यात अक्षय तृतीयेला चांदीने मुसंडी मारली होती. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीने दिलासा दिला होता.13 मे रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. तर 14 मे रोजी चांदी 700 रुपयांनी वधारली. बुधवारी 15 मे रोजी त्यात 400 रुपयांची भर पडली. दोन दिवसांत भावात 1100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,934 रुपये, 23 कॅरेट 72,642 रुपये, 22 कॅरेट सोने 66,808 रुपये झाले. 18 कॅरेट 54,701 रुपये, 14 कॅरेट सोने 42,666 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 84,505 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!