Gold Silver Rate Today 21 May 2024 : सोने एकदम सुसाट, 75 हजारांचा टप्पा ओलांडला, चांदी लवकरच लखपती, बाजारात काय आहे भाव

Gold Silver Rate Today 21 May 2024 : सहा महिन्यातच सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली. 21 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. तर एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये होता. आता किंमती सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

Gold Silver Rate Today 21 May 2024 : सोने एकदम सुसाट, 75 हजारांचा टप्पा ओलांडला, चांदी लवकरच लखपती, बाजारात काय आहे भाव
सोने-चांदी एकदम सूसाट
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 8:40 AM

मार्च आणि एप्रिलमध्ये सोने आणि चांदीने दमदार, चमकदार कामगिरी केली. मे महिन्याच्या सुरुवातीच्या 15 दिवसांत मौल्यवान धातूंना कमाल दाखविता आली नाही. पण अक्षय तृतीयेला पहिल्यांदा दोन्ही धातूंनी धमाका केला. 21 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. तर एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये होता. आता सोन्याने 75 हजारांची झेप घेतली तर चांदीने पण एक लाखांकडे आगेकूच केली. आता सोने आणि चांदीच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 21 May 2024 )

सोने सूसाट

गेल्या आठवड्यात सोने जवळपास दोन हजार रुपयांनी महागले होते. तर त्यात 770 रुपयांची घसरण आली होती. या आठवड्याची सुरुवात सोन्याने दरवाढीने केली. सोने 500 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची लाखाकडे धाव

21 जानेवारी रोजी एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये होता. तर गेल्या आठवड्यात चांदी जवळपास 7,000 रुपयांनी महागली होती. तर 500 रुपयांची घसरण झाली होती. शनिवारी 18 मे रोजी किंमती 3900 रुपयांनी वधारल्या. तर सोमवारी 20 मे रोजी चांदीने 3500 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीचा भाव अपडेट झालेला नाही. 24 कॅरेट सोने 73,383 रुपये, 23 कॅरेट 73,089 रुपये, 22 कॅरेट सोने 67,219 रुपये झाले. 18 कॅरेट 55,037 रुपये, 14 कॅरेट सोने 42,929 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 86,373 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Non Stop LIVE Update
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.