सोने एकदम सूसाट, चांदीने पण ठोकला षटकार, 10 ग्रॅमसाठी आता इतके मोजा दाम

Gold Silver Rate Today 22 March 2024 | सोने एकदम सूसाट सुटले तर चांदीने पण षटकार हाणला. सोने गुरुवारी अचानक हजार रुपयांनी वधारले. अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणामुळे हा बदल दिसून आला. तर व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्याने दोन्ही धातूंनी टॉपगिअर टाकला.

सोने एकदम सूसाट, चांदीने पण ठोकला षटकार, 10 ग्रॅमसाठी आता इतके मोजा दाम
सोने 67,000 मनसबदार, चांदीचा पण षटकारImage Credit source: कल्याण ज्वेलर्स
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 8:32 AM

दोन आठवड्यांच्या सवडीनंतर सोने आणि चांदीने टॉप गिअर टाकला. सोन्याने गुरुवारी हजार रुपयांची चढाई केली. तर चांदीने पण ग्राहकांना झटका दिला. 1 ते 10 मार्च दरम्यान सोने आणि चांदीने कमाल उसळी घेतली होती. त्यानंतर 11 मार्चपासून दोन्ही धातूंना मोठी कमाल दाखवता आली नाही. जितके भाव वधारले. तितकीच त्यात घसरण दिसून आली. पण या आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातूंनी पुन्हा एकदा रंग दाखवला. सराफा बाजारात गुरुवारी दुपारी एक वाजेनंतर किंमतींनी रॉकेट भरारी घेतली. काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 22 March 2024)…

सोन्याने टाकला टॉप गिअर – या आठवड्यात सुरुवातीला सोन्यात मोठा दिसला नाही. मार्चच्या सुरुवातीला सोने 3,430 रुपयांनी महागले. त्यानंतर दरवाढीला ब्रेक लागला. गेल्या आठवड्यात किंमतीत 620 रुपयांची घसरण झाली. तर या आठवड्यात, 18 मार्च रोजी सोने 210 रुपयांनी उतरले. 9 मार्च रोजी सोन्याच्या किंमती 460 रुपयांनी वधारली. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोन्याने गुरुवारी, 21 मार्च रोजी 1,000 रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 61,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 67,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 1500 रुपयांची उसळी – मार्चच्या सुरुवातीला, दहा दिवसांत चांदी 3 हजारांनी महागली. गेल्या आठवड्यात 2600 रुपयांनी किंमती वधारल्या आणि 900 रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात 18 मार्च रोजी 300 रुपयांची घसरण झाली. 19 मार्च रोजी तितकीच वाढ झाली. 20 मार्च रोजी 300 रुपयांनी किंमती उतरल्या. तर 21 मार्च रोजी चांदी 1500 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 78,500 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 66,914 रुपये, 23 कॅरेट 66,646 रुपये, 22 कॅरेट सोने 61,293 रुपये झाले.18 कॅरेट 50,186 रुपये, 14 कॅरेट सोने 39,145 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 75,045 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....