AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : वर्षाअखेरीस सोने-चांदीचा चौकार, असा वधारला भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने गेल्या आठवड्यात दमदार कामगिरी बजावली होती. या आठवड्यात पण मौल्यवान धातूची चढाई सुरुच आहे. वर्षाअखेरीस सोने-चांदी पुन्हा विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. भाव वधारल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

Gold Silver Rate Today : वर्षाअखेरीस सोने-चांदीचा चौकार, असा वधारला भाव
| Updated on: Dec 28, 2023 | 8:38 AM
Share

नवी दिल्ली | 28 डिसेंबर 2023 : सोने-चांदीच्या किंमती पुन्हा विक्रमी दिशेने धाव घेत आहे. गेल्या दहा दिवसांत एकदा किंमतीत घसरण नोंदविण्यात आलेली नाही. भाव एक तर स्थिर आहेत. अथवा भावात वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातूंनी दमदार आघाडी उघडली होती. दोन आठवड्यांपूर्वी सोने-चांदीत सलग तीन दिवस घसरण झाली होती. गेल्या 15 दिवसांपासून किंमतीत घसरण नाही. भाव एकतर स्थिर आहेत. अथवा भावांनी चढाई केली आहे. किंमती आता यापूर्वीच्या विक्रमाला घवसणी घालण्याच्या तयारीत आहेत. सोने आणि चांदीने यावर्षातील उच्चांकी झेप घेतली आहे. सोने 65,000 रुपयांचा तर चांदीने 78,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. काय आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 28 December 2023)

2300 रुपयांची झेप

दोन आठवड्यांचा विचार करता सोन्याने 2300 रुपयांची झेप घेतली. गेल्या आठवड्यात 880 रुपयांनी तर त्यापूर्वी 1100 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती स्थिर होत्या. 26 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी तर 27 डिसेंबर रोजी 100 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने घेतली भरारी

गेल्या दोन आठवड्याचा विचार करता चांदीत 5800 रुपयांची दरवाढ झाली. तर या आठवड्यात किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली आणि 300 रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात 25 डिसेंबर रोजी चांदीत 200 तर 26 डिसेंबर रोजी 300 रुपयांची दरवाढ झाली. तर 27 डिसेंबर रोजी 300 रुपयांची घसरण झाली. चांदीत या 15 दिवसांत एकूण 6300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 63,223 रुपये, 23 कॅरेट 62,970 रुपये, 22 कॅरेट सोने 57,912 रुपये झाले. 18 कॅरेट 47,417 रुपये, 14 कॅरेट सोने 36,986 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,064 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.