AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत स्वस्ताई; आता खरेदीचा आनंद साजरा करा

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने वर्षाअखेरीस आनंदवार्ता दिली. दोन आठवड्यानंतर सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला. गेल्या 15 दिवसांत मौल्यवान धातूंनी उसळी घेतली होती. दोन्ही धातूंमध्ये तुफान तेजी आल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला होता. अनेकांनी बाजारातून काढता पाय घेतला. या धातूत आता इतकी घसरण झाली.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत स्वस्ताई; आता खरेदीचा आनंद साजरा करा
| Updated on: Dec 30, 2023 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : सोने-चांदीने आनंदवार्ता आणली आहे. गेल्या 15 दिवसांपासून मौल्यवान धातूने भरारी घेतली होती. किंमतीत घसरण नव्हती. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. गेल्या दोन आठवड्यात सोन्याने 2700 रुपयांची भरारी घेतली. तर चांदी 6100 रुपयांनी वधारली होती. सोने-चांदीचे भाव तेजीत होते. त्याला ब्रेकच लागत नसल्याने ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती. पण वर्षाअखेर मौल्यवान धातूच्या किंमतींना ब्रेक लागला. किंमतीत मोठी पडझड झाली. किंमती घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत किंमतीत मोठी वाढ झाली आहे. असा आहे आता सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 30 December 2023)..

उसळीनंतर सोन्यात घसरण

गेल्या दोन आठवड्यात सोने चमकले. भाव 2700 रुपयांनी वधारले. या आठवड्यात सोने 700 रुपयांनी महागले. आता त्यात घसरण झाली आहे. 26 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी तर 27 डिसेंबर रोजी 100 रुपयांची दरवाढ झाली. 28 डिसेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली. 29 डिसेंबर रोजी त्यात 400 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत पडझड

या दोन आठवड्यात चांदी 6100 रुपयांनी वधारली होती. या आठवड्यात 25 डिसेंबरला चांदीत 200 तर 26 डिसेंबर रोजी 300 रुपयांची दरवाढ झाली. तर 27 डिसेंबर रोजी 300 रुपयांची घसरण झाली. 28 डिसेंबर रोजी 300 रुपयांची वाढ झाली. 29 डिसेंबर रोजी किंमती 1200 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,300 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 63,246 रुपये, 23 कॅरेट 62,993 रुपये, 22 कॅरेट सोने 57,933 रुपये झाले. 18 कॅरेट 47,435 रुपये, 14 कॅरेट सोने 36,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,395 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.