AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेला मोठा हादरा, थेट युद्धभूमीतून चिंताजनक बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी अपडेट

Iran vs US Israel War : इराणने अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. तसेच इस्रायलमधीलही अनेक शहरांवर मिसाईल हल्ले झाले आहेत. मात्र आता युद्धभूमीतून ट्रम्प यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेला मोठा हादरा, थेट युद्धभूमीतून चिंताजनक बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी अपडेट
Big Blow For USImage Credit source: Google
| Updated on: Mar 01, 2026 | 10:35 PM
Share

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत खळबळ उडाली आहे. इराणनेही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना उत्तर दिले आहे. इराणने अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. तसेच इस्रायलमधीलही अनेक शहरांवर मिसाईल हल्ले झाले आहेत. अशातच आता युद्धभूमीतून अमेरिकेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इराणी हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेचे सैनिक ठार

अमेरिकन सेंट्रल कमांडने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे 3 सैनिक ठार झाल्याची माहिती दिली आहे. मात्र या घटनेबाबत लष्कराने अधिक तपशील दिलेला नाही. अमेरिकन लष्कराने म्हटले आहे की इराणविरुद्धच्या ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये तीन सैनिक ठार झाले आणि पाच जण गंभीर जखमी झाले. इराणवर अमेरिका-इस्रायली संयुक्त हल्ल्यानंतर अमेरिकेला हा पहिला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.

श्रापनेलमुळे (छर्रा) अनेक सैनिक जखमी

सेंट्रल कमांडने सांगितले की, ‘अमेरिकेचे काही सैनिक श्रापनेलमुळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा युद्धभूमीवर पाठवले जात आहे. मोठ्या लष्करी कारवाया सुरू आहेत आणि मदतकार्य सुरू आहे. लष्कराने सांगितले की. शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा आदर करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबियांना माहिती देणार आहोत. त्यानंतर 24 तासांपर्यंत आम्ही त्यांची माहिती जारी करू.’

अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच

अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर दुसऱ्या दिवशाही हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणी सैन्याने मध्यपूर्वेतील जहाजे आणि अमेरिकेला पाठिंबा असणाऱ्या देशांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे. इराणी हल्लात जेरुसलेमजवळील हल्ल्यात किमान आठ लोक ठार झाले आहेत अशी माहिती इस्रायलकडून देण्यात आली आहे. दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्लात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्याच्यासह अनेक महत्त्वाचे नेते आणि अधिकारीही मारले गेल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.
अमेरिका, इस्त्रायल, इराण संघर्षामुळे जागतिक तेल बाजारावर परिणाम
अमेरिका, इस्त्रायल, इराण संघर्षामुळे जागतिक तेल बाजारावर परिणाम.
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; डिजिटल कार्डशिवाय...
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; डिजिटल कार्डशिवाय....
बा देवा महाराजा! रो रो सेवा सुरू होण्याआधी नितेश राणेंचं गाऱ्हाणं
बा देवा महाराजा! रो रो सेवा सुरू होण्याआधी नितेश राणेंचं गाऱ्हाणं.
नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?
नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?.
भाजपकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा
भाजपकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा.
अजितदादांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर रोहित पवारांचा सवाल
अजितदादांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर रोहित पवारांचा सवाल.
अमेरिका-इराण युद्ध; पुण्यातून आखाती देशात जाणारी विमाने रद्द
अमेरिका-इराण युद्ध; पुण्यातून आखाती देशात जाणारी विमाने रद्द.
भारत दबावाखाली झुकणार नाही; संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला
भारत दबावाखाली झुकणार नाही; संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला.