पाडव्यापूर्वीच सोन्या-चांदीची दरवाढीची गुढी, जणू शनीच आला ग्राहकांच्या राशीत

Gold Silver Rate Today 31 March 2024 | सोने आणि चांदीचा वसंत फुलला आहे. मार्च महिन्यात मौल्यवान धातूने मोठी मजल मारली. छत्रपती संभाजीनगरासह सुवर्णनगरी जळगावमध्ये भाव यापूर्वीच GST सह 70 हजारांच्या घरात पोहचले. मग सोने 75 हजारी मनसबदार होणार का?

पाडव्यापूर्वीच सोन्या-चांदीची दरवाढीची गुढी, जणू शनीच आला ग्राहकांच्या राशीत
सोने-चांदीची दरवाढीची गुढी
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 8:42 AM

ऋतुचक्रानुसार, शिशिराचा शुष्क पण संपून निसर्गाने वसंताची आरती सुरु केलेली आहे. मौल्यवान धातूत पण वसंताचे आगमन झाले आहे. सोने आणि चांदी मार्च महिन्यात रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहेत. पण ही आगेकूच ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवणारी ठरली आहे. मार्च महिन्यात सुरुवातीच्या दहा दिवसांत सोन्याने 3,430 रुपयांची तर चांदीने 3 हजार रुपयांची मुसंडी मारली होती. त्यानंतर 21 मार्च रोजी सोन्याने 1,000 रुपयांची उसळी घेतली. तर चांदी 1500 रुपयांनी वधारली. शनिवारी 29 मार्च रोजी सोन्यात 1300 रुपयांची दरवाढ झाली. त्यामुळे सोने लवकरच 75 हजारी मनसबदार होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काय आहे सोने आणि चांदीचा (Gold Silver Price Today 31 March 2024) भाव?

सोन्याची घौडदौड

या आठवड्यात 26 मार्चला सोन्यात 100 रुपयांनी उतरले. 27 मार्च रोजी 200 रुपयांनी वधारले. 28 मार्च रोजी सोने 350 रुपयांनी उसळेल.. तर 29 मार्च रोजी 1300 रुपयांची विक्रमी उडी सोन्याने नोंदवली. 30 मार्च रोजी त्यात 250 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 62,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत 800 रुपयांची वाढ

या आठवड्यात चांदीच्या किंमतीत चढउतार दिसून आला. 25 मार्चला चांदी 300 रुपयांनी महागली. 26 मार्च रोजी भाव तितकाच खाली आला. 27 मार्च रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. तर 28 आणि 29 मार्च रोजी सलग 300 रुपयांची वाढ झाली. 30 मार्च रोजी किंमती 200 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 78,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने दरवाढीची सलामी दिली. 24 कॅरेट सोने 67,252 रुपये, 23 कॅरेट 66,983 रुपये, 22 कॅरेट सोने 61,603 रुपये झाले.18 कॅरेट 50439 रुपये, 14 कॅरेट सोने 39,342 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,127 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हॉलमार्कनुसार कॅरेट

  • भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
  • काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.