AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 31 October 2024 : सोन्याची दमदार खेळी, चांदीने घेतली भरारी; नरक चतुर्दशी दिवशी अशा आहेत किंमती? ग्राहकांची तरीही भाऊगर्दी

Gold Silver Rate Today 31 October 2024 : दिवाळीत सोने आणि चांदीने धमाका केला. लक्ष्मी पूजनापूर्वीच दोन्ही धातुनी मोठी भरारी घेतली. सोने 1200 रुपयांनी तर चांदी किलोमागे दोन हजारांनी महागली. नरक चतुर्दशीच्या दिवशी पण भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही बाजारात ग्राहकांची भाऊगर्दी होत आहे.

Gold Silver Rate Today 31 October 2024 : सोन्याची दमदार खेळी, चांदीने घेतली भरारी; नरक चतुर्दशी दिवशी अशा आहेत किंमती? ग्राहकांची तरीही भाऊगर्दी
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Oct 31, 2024 | 8:47 AM
Share

दिवाळ सण मोठा नाही आनंदाला तोटा, अशी म्हण आहे. हौसेला मोल नसतं म्हणतात. दिवाळीत सोने आणि चांदीने गरूड भरारी घेतली आहे. सोने 1200 रुपयांनी तर चांदी किलोमागे दोन हजारांनी महागली. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातुत घसरण झाली होती. पडझडीच्या सत्रानंतर मौल्यवान धातुच्या किंमतींनी अचानक उसळी घेतली. नरक चतुर्दशीच्या दिवशी पण भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही बाजारात ग्राहकांची भाऊगर्दी होत आहे. आता या बेशकिंमती धातुच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 31 October 2024 )

दिवाळीत सोन्याची भरारी

गेल्या आठवड्यात सोने 1400 रुपयांनी वधारले. तर या आठवड्याच्या सुरुवातीला भाव 490 रुपयांनी स्वस्त झाले. 29 ऑक्टोबरला आणि 30 ऑक्टोबर रोजी सोन्याने अनुक्रमे 600 आणि 700 रुपयांची भरारी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 2 हजारांची उसळी

29 सप्टेंबरनंतर जवळपास 20 दिवस चांदीत मोठी उलाढाल दिसली नाही. पण त्यानंतर चांदीचा वारु उधळला. गेल्या आठवड्यात चांदी 3 हजार रुपयांनी उसळली तर त्यात 6,000 रुपयांची घसरण झाली. तर या 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी प्रत्येकी 1 हजारांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,581, 23 कॅरेट 79,262, 22 कॅरेट सोने 72,896 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 59,686रुपये, 14 कॅरेट सोने 46,555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,040 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.