AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या काय आहेत भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने या आठवड्यात ग्राहकांना मोठा दिलासा दिला. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मौल्यवान धातूमध्ये चढउतार दिसून आला. सुरुवातीला किंमतीत मोठी वाढ झाली. त्यानंतर मौल्यवान धातूत पडझड झाली. ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या काय आहेत भाव
| Updated on: Jan 07, 2024 | 8:32 AM
Share

नवी दिल्ली | 7 जानेवारी 2024 : सोने-चांदीने वर्षाच्या सुरुवातीला मोठी उसळी घेतली. त्यानंतर किंमतीत घसरण दिसून आली. दिवाळीपासून सोने-चांदीने घौडदौड सुरुच ठेवली आहे. दरवाढीने ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडले होते. सोन्याचा भाव तर 66 हजारांच्या घरात पोहचला होता. चांदीने पण कमाल उसळी घेतली होती. नवीन वर्षात पण दरवाढीचे सत्र सुरु होते. त्याला 3 जानेवारी रोजी ब्रेक लागला. आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात सोने 900 रुपयांनी तर चांदी 2300 रुपयांनी घसरली. त्यानंतर सोन्यात मामूली दरवाढ झाली. या मौल्यवान धातूचा असा आहे भाव (Gold Silver Price Today 7 January 2024)

मामूली दरवाढ

डिसेंबर महिन्यात सोन्याने दरवाढीचे रेकॉर्ड मोडले. 66 हजारांच्या जवळपास भाव पोहचला. 2 जानेवारी 2024 रोजी सोन्याची किंमत 270 रुपयांनी वाढली. 3 जानेवारी सोने इतकेच घसरले. 4 जानेवारी रोजी त्यात 440 रुपयांची घसरण झाली. 5 जानेवारी रोजी सोने 130 रुपयांनी उतरले. 6 जानेवारी रोजी त्यात 20 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी झाली स्वस्त

गेल्या वर्षात चांदीने मोठा पल्ला गाठला. चांदीत मोठी वाढ झाली. 2 जानेवारी 2024 रोजी चांदीचा दर 300 रुपयांनी वाढला. 3 जानेवारी रोजी 300 रुपयांची घसरण झाली. 4 जानेवारी रोजी किंमती 2000 रुपयांनी कमी झाल्या. काल भावात मोठा बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,540 रुपये, 23 कॅरेट 62,290 रुपये, 22 कॅरेट सोने 57287 रुपये झाले. 18 कॅरेट 46,905 रुपये, 14 कॅरेट सोने 36,586 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,550 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हॉलमार्कनुसार कॅरेट

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.