Gold Silver Rate Today | सोन्याची धुवांधार बॅटिंग! चांदी मात्र अडखळली, आता काय आहेत किंमती

Gold Silver Rate Today 7 March 2024 | तर सोने आणि चांदीला मार्च पावला. पण ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. यापूर्वीच सोने आणि चांदी सूसाट धावणार हा अंदाज वर्तवला होता. तो खरा ठरला. आता तर सोने 70 हजारांचा लवकरच टप्पा गाठणार असा अंदाज आहे. जागतिक संकेतांआधारे हा अंदाज वर्तविल्या जात आहे.

Gold Silver Rate Today | सोन्याची धुवांधार बॅटिंग! चांदी मात्र अडखळली, आता काय आहेत किंमती
सोने सूसाट, चांदीने घेतली माघारImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 8:38 AM

नवी दिल्ली | 7 March 2024 : सोने आणि चांदीला अखेर मार्च महिना पावला. मार्चमध्ये सोन्याने 2300 रुपयांची उसळी घेतली आहे. तर चांदी दोन हजारांच्या घरात वाढली. अर्थात या दरवाढीच्या सत्राला चांदीने ब्रेक लावला. चांदीत घसरण झाली. सोन्याची आगेकूच सुरु आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, मार्चमध्ये किंमती भडकण्याची शक्यता होतीच. 1 मार्च रोजीपासून सोने आणि चांदी कमाल दाखवतील असा अंदाज वर्तवला होता. तो खरा ठरला. या दरवाढीने ग्राहकांना घाम फोडला आहे. काय आहेत सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 7 March 2024) जाणून घ्या..

सोने एकदम तेजीत

सोने मार्च माहिन्यात सूसाट आहे. या महिन्यात 1 मार्चपासून ते 6 मार्चपर्यंत सोन्याने 2300 रुपयांची चढाई केली. 1 मार्चला 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वाढल्या. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 5 मार्च रोजी भाव 700 रुपयांनी वाढला. 6 मार्च रोजी 250 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 59,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीने घेतली माघार

यापूर्वी चांदी 3400 रुपयांनी स्वस्त झाली होती. तर मार्च महिन्यात चांदीने जोरदार उसळी घेतली. चांदीत या महिन्यात चढउताराचे सत्र सुरु आहे. प्रत्येक दिवशी किंमती कमी-अधिक होत आहे. 1 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी महागली. 2 मार्च 500 रुपयांची वाढ झाली. 3 मार्चला 1400 रुपयांची स्वस्ताई आली. तर 5 मार्च रोजी चांदी 1100 रुपयांनी वधारली. 6 मार्च रोजी 200 रुपयांनी किंमती कमी झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 64,493 रुपये, 23 कॅरेट 64,235 रुपये, 22 कॅरेट सोने 59,075 रुपये झाले.18 कॅरेट 48,369 रुपये, 14 कॅरेट सोने 37,728 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,710 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.