AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : आनंदवार्ता! सोने-चांदीत मोठी घसरण, भाव निच्चांकावर

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा प्रवास निच्चांकाकडे सुरु झाला आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दोघांनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. आता मौल्यवान धातूंचा परतीचा प्रवास सुरु आहे. सोने-चांदीत 13 टक्क्यांची घसरण आली आहे. गेल्या चार महिन्यातील हा निच्चांक आहे. दिवाळीपर्यंत मौल्यवान धातू स्वस्त होतील.

Gold Silver Rate Today : आनंदवार्ता! सोने-चांदीत मोठी घसरण, भाव निच्चांकावर
| Updated on: Oct 07, 2023 | 8:37 AM
Share

नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : सोने-चांदीची चकाकी एकाएक हरवली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला धुमाकूळ घालणारे हे दोन्ही धातू उतरणीला लागले आहे. सोने-चांदीचा प्रवास निच्चांकाकडे सुरु झाला आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दोन्ही धातू खऱ्या अर्थाने मौल्यवान ठरले होते. पण त्यानंतर त्यांना मोठा पल्ला गाठता आला नाही. एका विशिष्ट किंमतीत चढउताराचे सत्र सुरु होते. सोने-चांदीतील गुंतवणूक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी मानण्यात येते. सोने-चांदीने या 10-13 वर्षात दुप्पटीपेक्षा पण अधिक मजल मारली. ग्राहकांनाच नाही तर अनेक तज्ज्ञांना पण हा धक्का होता. तर आता दोन्ही धातूंचा परतीचा प्रवास सुरु आहे. दिवाळीपर्यंत सोने-चांदीत (Gold Silver Rate Today 7 October 2023) मोठी घसरण येण्याची शक्यता आहे.

सोन्यात स्वस्ताई

गुडरिटर्न्सनुसार, 1 ऑक्टोबर रोजी सोने जैसे थे होते. 2 ऑक्टोबरला त्यात 150 रुपयांची घसरण झाली. 3 ऑक्टोबर रोजी 650 रुपयांनी किंमती खाली आल्या. 4 ऑक्टोबर रोजी किंमतीत बदल झाला नाही. 5 ऑक्टोबरला 200 रुपयांनी भाव उतरले. पण काल त्यात किंचित वाढ झाली. 22 कॅरेट सोने 52,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,380 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीत आपटी बार

सप्टेंबर महिन्यात चांदीत घसरणीचे सत्र सुरु होते. महिन्याच्या पहिल्या सत्रात किंमती 5000 रुपयांनी पडल्या. त्यानंतर भाव वधारले. शेवटच्या सत्रात पुन्हा घसरण झाली. 1 ऑक्टोबर रोजी किंमती जैसे थे होत्या. 2 ऑक्टोबर रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 3 ऑक्टोबर रोजी चांदी 2000 रुपयांची पडझड दिसली. 4 ऑक्टोबरला 300 रुपयांनी भाव घसरले. 5 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे 400 आणि 500 रुपयांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 70,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 56,539 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 56,313 रुपये, 22 कॅरेट सोने 51790 रुपये, 18 कॅरेट 42,404 रुपये, 14 कॅरेट सोने 33,075 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 67,095 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.