AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold : BSE वर शेअरच नाही तर करा सोन्याची खरेदी-विक्री, मिळतील या सुविधा

Gold : शेअर बाजारात आता शेअरच नाही तर सोन्याची ही खरेदी-विक्री करता येणार आहे..

Gold : BSE वर शेअरच नाही तर करा सोन्याची खरेदी-विक्री, मिळतील या सुविधा
शेअर बाजारात सोन्याची-खरेदी विक्रीImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 25, 2022 | 3:06 PM
Share

नवी दिल्ली : आता शेअर बाजारात तुम्हाला शेअरच नाहीतर सोन्याची ही खरेदी-विक्री करता येणार आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजवर(BSE) इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्टची (Electronic Gold Receipt) सुरुवात झाली आहे. यामुळे आता बीएसईवर सोन्याची खरेदी-विक्री करता येणार आहे. बाजार नियामक आयोग, भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने (SEBI) BSE च्या प्लॅटफॉर्म वर इलेक्ट्रॉनिक्स गोल्ड रिसिप्ट (Electronic Gold Receipt (EGR)) सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.

BSE ने अधिकृत निवेदन दिले आहे. त्यानुसार, दिवाळीच्या मुहुर्तावर, व्यवहार करताना, 995 आणि 999 शुद्धतेच्या सोन्यात ग्राहकांना खरेदी-विक्री करता येईल. ग्राहकांना एक ग्रॅम अथवा त्याच्या पटीत व्यवहार करता येणार आहे. विक्री मात्र 10 ग्रॅम अथवा 100 ग्रॅमच्या पटीत करता येईल.

गेल्या महिन्यात सेबीने ईजीआर सुरु करण्यास अंतिम मंजुरी दिली होती. बीएसईने यापूर्वी या व्यापाराची (Trading) चाचणीही करुन पाहिली आहे. त्यानंतर दिवाळीच्या मुहुर्तावर ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

या ठिकाणी तुम्ही शेअरप्रमाणेच सोन्याची खरेदी विक्री करु शकता. त्यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते (Demat Account) असणे आवश्यक आहे. त्यासाठी नव्याने कोणतेही खाते उघडण्याची गरज नाही.

ईजीआरच्या माध्यमातून गुंतवणूकदार, बँक, रिफाइनर्स, सराफा व्यापारी, दागिने विक्रेते सोन्याची खेरदी विक्री करु शकतील. शेअरप्रमाणाचे त्यांना सोन्याची दर्शनी किंमती दिसेल.

जर तुम्हाला सोन्याची खरेदी-विक्री करायची असेल तर तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही सोने खरेदी विक्री करु शकता. खरेदी केलेले सोने तुमच्या डीमॅट खात्यात जमा होईल,

जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर त्यासाठी बीएसई डिलिव्हरी सेंटरवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला भौतिक सोने (Physical Gold) दागिने अथवा सोन्याच्या शिक्क्यांमध्ये प्राप्त करता येईल.

एवढच नाही तर आता गुंतवणूकदारांना त्यांचे घरातील सोने बीएसईवर विक्री करता येणार आहे. बीएसईने त्यासाठी ब्रिंक्स इंडिया आणि सिक्वेल लॉजिस्टिक्ससोबत करार केला आहे. या कंपन्यांच्या शाखेत सोने दिल्यानंतर ईजीआर रुपात हे सोने तुमच्या डीमॅट खात्यात जमा होईल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.