AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cancer Anti Drugs : गुडन्यूज, कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा, ही तीन औषधं स्वस्त

Cancer Anti Medicine : कॅन्सर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आनंदाची बातमी आहे. काही औषधांवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. तर सीमा शुल्कात पण सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने औषध उत्पादक कंपन्यांना औषधांचे दर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Cancer Anti Drugs : गुडन्यूज, कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा, ही तीन औषधं स्वस्त
| Updated on: Dec 07, 2024 | 2:39 PM
Share

भारत सरकारने तीन अँटी-कॅन्सर औषधांच्या किंमतीत कपातीचे निर्देश कंपन्यांना दिले आहेत. त्याचा कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फायदा होणार आहे. केंद्रीय रसायन आणि खत राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी शुक्रवारी लोकसभेत एक लिखित उत्तर दिले आहे. त्यानुसार, Trastuzumab Deruxtecan, Osimertinib आणि Dervalumab या औषधांच्या कमाल किंमतीत कपतीचे निर्देश देण्यात आले आहेत. या औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी शुन्यावर आणण्यात आली आहे. तर जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

रुग्णांना मोठा दिलासा

कॅन्सरच्या रुग्णांना आर्थिक फटका बसू नये आणि त्यांचा औषधांवरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा मंत्र्यांनी केला. औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी या अधिसूचनांचे पालन करून औषधांच्या किंमती कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राष्ट्रीय औषधी मूल्य निश्चित प्राधिकरणाने (NPPA) याविषयीच्या बदलाची सूचना दिली आहे.

याशिवाय एनपीपीएने एक सूचना जारी केली आहे. त्यात कॅन्सर औषधी निर्मिती कंपन्यांना दरात कपात करण्याची सूचना देण्यात आली आहे. जीएसटी दर आणि सीमा शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याचा फायदा कॅन्सर रुग्णांना मिळणार आहे. एस्ट्राजेनेका फार्मा इंडिया लिमिटेडने त्यांच्या काही औषधांच्या किंमतीत कपात केल्याची माहिती देण्यात आली आहे.

5 वर्षांपूर्वी 9.3 लाख मृत्यू

केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानुसार, एस्ट्राजेनेकाने याविषयीचे एक पत्र दिले आहे. त्यात बीसीडी शून्य झाल्याने नवीन बाजारातील स्टॉकची विक्री कमी किंमतीत करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर या औषधांच्या किंमती अधिक स्वस्त होतील. देशात कॅन्सरच्या रुग्णात वृद्धी होत असल्याचे दिसून आले आहे. एका संशोधनानुसार, 2019 मध्ये भारतात जवळपास 12 लाख नवीन कॅन्सरचे प्रकरण नोंदवण्यात आले आहे. तर 9.3 लाख मृत्यू झाले आहेत. आशिया खंडात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण असणारा भारत हा दुसरा देश आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रुग्णांना आता उपचारासाठी अधिक खर्च येणार नाही. औषधाच्या किंमतीत कपात झाल्याने त्यांच्यावरील आणि कुटुंबावरील आर्थिक खर्चाचा बोजा कमी होईल. कॅन्सर औषधांवरील खर्चात कपात झाल्याने त्यांच्या खर्चात कपात होणार आहे

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.