पतंजली गुंतवणूकदारांसाठी खूशखुबरी ! प्रत्येक शेअरवर मिळणार इतका डिव्हीडंड, तारखेवर ठेवा लक्ष
शेअरधारकांसाठी फायद्याचा पेटारा उघडला आहे. कंपनीने १.७५ प्रति शेअरच्या अंतरिम डिव्हीडेंडची घोषणा केली आहे.

देशाच्या मुख्य एफएमसीजी कंपनीत समाविष्ट असलेल्या पतंजली फूड्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना एक शानदार गिफ्ट दिले आहे. कंपनीच्या बोर्डाने आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी अंतरिम लाभांशाला (Interim Dividend) मंजूरी दिली आहे. हा निर्णय कंपनीच्या तिमाही निकालाच्या घोषणेसोबत आला आहे.या निकालात कंपनीच्या लाभात जबरदस्त ६७ टक्के उसळी आली आहे. जर तुमच्याकडे देखील पतंजली फूड्सचे शेअर असतील, तर ही बातमी थेट तुमच्या गुंतवणूक आणि त्यावर मिळणाऱ्या परताव्या संदर्भातील आहे. कंपनीने लाभांशाची रक्कम संदर्भात त्याच्या वाटपाच्या तारखेपर्यंत सर्व आवश्यक माहितीची घोषणा केली आहे.
प्रत्येक शेअरमागे किती लाभांश ?
पतंजली फूड्सच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने त्याच्या २ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक इक्वीटी शेअरवर १.७५ रुपयांचा अंतिरिम लाभांश देणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जेवढे शेअर असतील त्याला १.७५ ने गुणल्यानंतर जेवढी रक्कम येईल तेवढा तुम्हाला एकूण लाभांशांची रक्कम मिळणार आहे.
या लाभांशसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट (Record Date) १३ नोव्हेंबर २०२५ निश्चित केली आहे. रेकॉर्ड डेट ती कट-ऑफ तारीक असते, ज्या दिवशी कंपनी आपले रेकॉर्ड्समध्ये तपासते की कोण-कोणते गुंतवणूकदार तिचे शेअर होल्डर आहेत. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर १३ नोव्हेंबर रोजी ज्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात पतंजलीचे फूड्सचे शेअर असतील,ते या लाभांश मिळण्याचे हक्कदार असतील.
गुंतवणूकदारांसाठी एक खास गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. भारतात आता T+1 सेटलमेंट सायकल लागू आहे याचा अर्थ जर एखाद्या गुंतवणूकदाराने हा विचार करुन १३ नोव्हेंबर रोजी शेअर खरेदी केले असतील तर त्याला डिव्हीडेंट मिळू शकणार नाही. T+1 व्यवस्थेअंतर्गत शेअर खरेदी करण्याच्या एक कामकाजाच्या दिवसानंतर तो डीमॅट खात्यात क्रेडिट होतो. यासाठी लाभांशाचा लाभ मिळण्यासाठी गुंतवणूकदाराला हे पक्के करावे लागेल की १३ नोव्हेंबरच्या ( रिकॉर्ड डेट ) रोजी शेअर त्यांच्या डीमॅट खात्यात आधीच समाविष्ठ असायाला हवा.
कंपनीने हे देखील स्पष्ट केले की या लाभांशाचे पेमेंट गुंतवणूकदारांच्या बँक खातेत ७ डिसेंबर २०२५ पर्यंत केले जाणार आहे. कंपनीच्या या निर्णयाने एकूण ५९.३६ कोटी रुपयांचा लाभांश वाटला जाणार आहे.
नफ्यात ६७ टक्के दमदार उसळी
डिव्हीडेंटची ही घोषणा कंपनीच्या शानदार तिमाही परिणामाच्या आधारे केली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत (Q2)पतंजली फूड्सने नफात चांगली कामगिरी केली आहे. कंपनीचा कंसोलिडेटेड शुद्ध नफा (Net Profit) गेल्या वर्षीच्या समान तिमाहीच्या तुलनेने ६७ टक्के वाढून ५१६.६९ कोटींवर पोहचला आहे. ही एक मोठी वाढ आहे.तर आकड्यांवर नजर टाकली तर गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीने ३०८.५८ कोटी रुपये नफा कमावला होता.
केवळ नफाच नाही तर कंपनीच्याय एकूण उत्पन्न (Total Income) देखील चांगले वाढले आहे. सप्टेंबर २०२५ तिमाहीत कंपनीचे उत्पन्न २०.९ टक्के वाढून ९,७९८.८० कोटी रुपये झाले आहे.
शेअर बाजारात शानदार प्रदर्शन
कंपनीच्या या घोषणांचा परिणाम शुक्रवारी शेअर बाजारातही पाहायला मिळाला. पतंजली फूड्सचा शेअर (Patanjali Foods Share Price) शुक्रवारी १.०३ टक्क्यांच्या वाढी सह ५७८.९० रुपयांच्या पातळीवर वाढू बंद झाला. दिवसाच्या कामकाजादरम्यान यात १.२२ टक्क्यांपर्यंत वाढ देखील झाली.
जर आपण याच वर्षी म्हणजे २०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत कामगिरी पाहिली तर शेअरच्या किंमतीत २.५४ टक्के घसरण झाली आहे. तर गेल्या १२ महिन्यांचे आकडे पाहाता शेअर ५.३६ टक्के खाली आहे. परंतू शेअरबाजार नेहमी लांबच्या प्रदीर्घकाळातील गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. ज्या गुंतवणूकदारांना पतंजली फूड्सवर दीर्घकाळ गुंतवणूक केली आहे. त्यांना कंपनी निराश करणार नाही. गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड पाहिला तर या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना २२४ टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
