AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO ची आनंदवार्ता! कर्मचाऱ्यांना 45,000 रुपयांचा फायदा होणार, अपेडट तरी काय?

ईपीएफओने कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता दिली आहे. कर्मचाऱ्यांना जवळपास 45,000 रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. ईपीएफओ सातत्याने बदल करत आहे. अनेक सोयी-सुविधा देत आहे. लवकरच ईपीएफओचे एटीएम सुद्धा येणार आहे. त्यात ही खुशखबर आली आहे. काय आहे अपडेट?

EPFO ची आनंदवार्ता! कर्मचाऱ्यांना 45,000 रुपयांचा फायदा होणार, अपेडट तरी काय?
ईपीएफओ मोठी आनंदवार्ता
| Updated on: Nov 29, 2025 | 8:37 AM
Share

EPFO Interest Update: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, ईपीएफओने (EPFO) कर्मचाऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. पुढील आर्थिक वर्षात 2025-26 साठी व्याजदर वाढण्याची शक्यता समोर येत आहे. सरकार यावेळी पीएफ सदस्यांच्या व्याजदरात घसघशीत वाढ करण्याची शक्यता आहे. एका दाव्यानुसार पीएफवरील व्याजदर(PF Interest Rate) 9% च्या घरात असू शकतो. सध्या 2024-25 या आर्थिक वर्षात व्याजदर 8.25% इतका आहे. यामध्ये 0.75% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर जवळपास 7 ते 7.5 कोटी EPF कर्मचाऱ्यांना थेट लाभ होईल. अद्याप या व्याजदराविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. ईपीएफओचे विश्वस्त मंडळ याविषयीचा निर्णय घेईल.

कोणाला मिळेल किती लाभ?

जर व्याजदर 9% निश्चित मानला तर कर्मचाऱ्यांच्या रक्कमेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

जर पीएफ खात्यात 5 लाख रुपये जमा असतील तर त्यावर 45,000 रुपयांचे व्याज मिळेल

4 लाख रुपये जमा झाल्यावर त्यावर 36,000 रुपयांचे व्याज मिळेल

3 लाख रुपये पीएफ खात्यात असतील तर वार्षिक 27,000 रुपये व्याज मिळेल

माध्यमातील वृत्तानुसार, हा प्रस्ताव येत्या फेब्रुवारी महिन्यात मंजूर होऊ शकतो. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट अतिरिक्त रक्कम जमा होईल. यामुळे कोट्यवधी नोकरदारांना मोठी आर्थिक मदत मिळेल. त्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल. त्यांना एक प्रकारे लॉटरीच लागले.

ईपीएफओ पोर्टलवर असे तपासा बँलेन्स (How to view EPF passbook on EPFO portal?)

स्टेप-1: UAN सदस्य ईपीएफओ पोर्टल (EPFO Portal) ला भेट द्या

स्टेप-2: आता तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड टाका

स्टेप-3: नंतर मोबाइल OTP व्हेरिफिकेशन करा

स्टेप-4: लॉगिन झाल्यानंतर Passbook Lite वर जा आणि डाऊनलोड करा. येथे पीएफ बँलेन्स दिसेल

उमंग ॲपवर असे तपासा ईपीएफ पासबुक(How to check EPF passbook through Umang app)

स्टेप-1: UMANG App डाऊनलोड करून लॉगिन करा

स्टेप-2: सर्चमध्ये EPFO लिहा

स्टेप-3: View Passbook वर क्लिक करा

स्टेप-4: UAN क्रमांक टाका

स्टेप-5: OTP सबमिट करा

स्टेप-6: Member ID निवडून पासबुक डाऊनलोड करा. पासबुक उघडल्यावर पीएफ बॅलेन्स तपासा

EPFO दरवर्षी व्याजाची रक्कम ईपीएफ सदस्यांच्या खात्यात जमा करते. या वर्षी 8.25% व्याज देण्यात आले आहे. आता प्रत्येक कर्मचाऱ्यांना 2025-26 साठी नवीन व्याजदराची प्रतिक्षा आहे. हा व्याजदर अधिक असण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी लागेल. त्यांच्या खात्यात व्याजाची मोठी रक्कम जमा होईल.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.