EPFO ची गुडन्यूज! आता कर्मचार्यांना झटपट काढता येणार PF, UPI सेवेविषयी मोठी वार्ता
EPFO News: ईपीएफओने कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आणली आहे. एटीएम सेवा सुरु होण्यापूर्वी आता UPI चा पर्याय सदस्यांना मिळणार आहे. काय आहे ती महत्त्वाची वार्ता, यामुळे सदस्यांना मोठा फायदा होणार आहे. नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना हे मोठं गिफ्ट देण्यात येत आहे.

EPFO News: ईपीएफओ सदस्यांसाठी डिजिटल सुविधा सुरु होणार आहे. भविष्य निधीचा (PF) पैसा काढणे आता अधिक सुकर आणि सोपं होणार आहे. EPFO लवकरच भीम युपीआय ॲपच्या (BHIM UPI App) माध्यमातून लागलीच आगाऊ रक्कम काढता येईल. ही सुविधा लवकरच सुरू होत आहे. या सेवेमुळे देशातील जवळपास 30 कोटींहून अधिक EPFO सदस्यांना मोठा फायदा होणार आहे. ही सुविधा येत्या 2–3 महिन्यात सुरू होऊ शकते. ही सुविधा ATM सेवेअगोदर सुरू होण्याची शक्यता आहे. कर्मचारी आता गरज असेल तेव्हा लागलीच PF खात्यातून पैसे काढू शकतील. EPFO चे हे मोठे डिजिटल बदलाव मानल्या जात आहे.
काय ही सुविधा?
या नवीन व्यवस्थेसाठी EPFO ने NPCI सोबत करार केला आहे. BHIM ॲपवर EPFO सदस्य आरोग्य, शिक्षण, लग्न वा इतर खास कारणांसाठी या श्रेणीतून आगाऊ PF रक्कम काढण्यासाठी दावा करू शकतील. क्लेम केल्यानंतर EPFO सदस्यांच्या खात्याची पडताळणी करेल. सर्व योग्य वाटल्यास लागलीच त्याची विनंती मान्य होईल. मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचारी थेट SBI च्या माध्यमातून सदस्याच्या UPI शी संबंधित खात्यातून रक्कम त्यांच्या खात्यात वळती करू शकतील. ही सुविधा केवळ BHIM ॲपवरच मिळेल. नंतर ही सुविधा इतर UPI आधारीत फिनटेक ॲप्सवर पण सुरू होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
रक्कम काढण्यासाठी मर्यादा
ही सुविधा प्राप्त करण्यासाठी काही मर्यादा असेल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातील संपूर्ण पीएफ रक्कम काढण्याची परवानगी नसेल. RBI च्या नियमानुसार आणि UPI व्यवहार मर्यादेनुसार ही रक्कम काढता येणार आहे. त्यानुसारच त्वरीत रक्कम काढण्यासाठी एक मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेचा कोणी गैरफायदा घेऊ शकणार नाही. अधिकाऱ्यांच्या मते सर्व रक्कम काढण्याची अनुमती देणे हा एक धोका असू शकतो.
सदस्यांना एटीएम सुविधेची प्रतिक्षा आहे. ही सुविधा मिळाल्यास त्यांना झटपट रक्कम काढता येईल. EPFO सदस्यांसाठी डेबिट कार्ड आणणार आहे. हे डेबिट कार्ड त्यांच्या पीएफ खात्याशी जोडलेले असेल. या कार्डच्या मदतीने सदस्य कोणत्याही एटीएमवर जाऊन PF खात्यातील रक्कम थेट काढू शकतील. ही प्रक्रिया बँक खात्याविना सहज पूर्ण करता येईल.सध्या PF खात्यातून रक्कम काढण्यासाठी अगोदर ऑनलाईन क्लेम अर्ज दाखल करावा लागतो. पण नवीन सिस्टिम अंतर्गत ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुकर होईल. सदस्यांना त्यांना गरज असेल तेव्हा लागलीच पैसे काढता येईल.
