AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाद्य तेलाच्या किंमती आणखी होणार स्वस्त; कंपन्याना सरकारचा किंमती कमी करण्याचा आदेश; 12 रुपयांपर्यंत मिळणार दिलासा

मुंबईः खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमती मधल्या काळात प्रचंड वाढल्याने जनसामान्यांना त्याचा फटका बसला होता. मात्र आता आगामी काळात खाद्यतेलाच्या किंमतीत (edible oil price) आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याच्या सूचना सरकारकडून कंपन्यांना देण्यात आल्या आत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्यात उत्पादनांच्या किंमती कमी करण्यास सांगण्यात आल्या […]

खाद्य तेलाच्या किंमती आणखी होणार स्वस्त; कंपन्याना सरकारचा किंमती कमी करण्याचा आदेश; 12 रुपयांपर्यंत मिळणार दिलासा
| Updated on: Jul 06, 2022 | 4:48 PM
Share

मुंबईः खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमती मधल्या काळात प्रचंड वाढल्याने जनसामान्यांना त्याचा फटका बसला होता. मात्र आता आगामी काळात खाद्यतेलाच्या किंमतीत (edible oil price) आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याच्या सूचना सरकारकडून कंपन्यांना देण्यात आल्या आत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्यात उत्पादनांच्या किंमती कमी करण्यास सांगण्यात आल्या आहेत. सरकारकडून (Government) खाद्यतेलाच्या किंमतीत आणखी 10 ते 15 टक्के कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात कंपन्यांनी खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांची कपात केली होती.

या संदर्भात सरकारकडून आज या तेल क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची बैठक घेण्याक आली. यावेळी खाद्यतेलाच्या दरात कपात करण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. खाद्यतेलाची किंमत 12 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

किंमती किती कमी होऊ शकतात

सध्याच्या परिस्थितीत खाद्यतेलाच्या किमती 15-20 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. त्यामुळे कंपन्या 10 ते 12 रुपयांनी प्रतिलिटर किमती कमी करू शकतात असं सरकारकडून व्यक्त करण्यात आले आहे.आज झालेल्या बैठकीत अनेक खाद्यतेल कंपन्यांनीही दर कमी करण्यास सहमती दर्शवली असून येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात कपात करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

जगभरात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ

आजच्या बैठकीत अन्न विभागाचे सचिव सुधांशू पांडे उपस्थित होते. जगभरात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातही दर कमालीचे वाढले होते. भारताकडून गरजेपेक्षा कमी खाद्यतेल आयात करतो, अशा स्थितीत परदेशातील बाजारातील वाढीचा थेट परिणाम किरकोळ किंमतीवर झाल्याचे दिसून आले आहे.

खाद्य तेलाच्या शुल्कात कपात

अलीकडच्या काळात, सरकारकडून खाद्य तेलाच्या शुल्कात कपात करण्यासारखी महत्वाचा निर्णय उचलला जाऊ शकतो. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीही सुधारत असल्याचे सांगण्याता आले आहे. अशा परिस्थितीत देशातील किरकोळ विक्रीचे दरही खाली आले आहेत. मात्र, घाऊक किमतीत जेवढी घसरण झाली तेवढी किरकोळ दरात घट झाली नसल्याचे सरकार मान्य करत आहे.

परदेशी बाजारात घसरण

सध्या खाद्यतेलाच्या घाऊक दरात नरमाई झाल्याचे दिसून येत आहे. परदेशात खाद्यतेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण झाल्याचे वृत्त पीटीआयकडून छापण्यात आले होते. या घसरणीदरम्यान कच्च्या पामतेल आणि पामोलिन तेलाच्या किंमती खाली आल्या आहेत. परदेशी बाजारातील घसरणीमुळे आणि सरकारने रिफायनिंग कंपन्यांना दरवर्षी 2 दशलक्ष टन सोयाबीन आणि 2 दशलक्ष टन सूर्यफूल तेल आयातीचा कोटा जारी केल्याने सोयाबीन तेलाच्या किंमतीतही घसरण झाली आहे. यामुळे देशांतर्गत तेल कंपन्यांचा खर्च कमी झाला आहे. सरकारने या कमतरतेचा फायदा किरकोळ ग्राहकांना देण्यास सांगितले आहे. गेल्या महिन्यातच अनेक कंपन्यांनी खाद्यतेलाच्या दरात कपात करण्यात आली होती. तथापि, गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात पीटीआयच्या अहवालात, सूत्रांनी सांगितले की, विदेशी बाजारातील किंमती प्रति लिटर 40-50 रुपयांनी कमी झाल्या आहेत. आणि तरीही घाऊक किमतीत झालेल्या घसरणीचा पूर्ण फायदा कंपन्या ग्राहकांना देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.