Supreme Court GST News | हुश्श! जीएसटीचा पैसा परत मिळणार, व्यावसायिकांच्या प्रदीर्घ लढ्याला यश, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Supreme Court GST News | GST च्या परताव्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे शेकडो व्यावसायिकांचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.

Supreme Court GST News | हुश्श! जीएसटीचा पैसा परत मिळणार, व्यावसायिकांच्या प्रदीर्घ लढ्याला यश, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 8:06 PM

Supreme Court GST News | जीएसटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) पोर्टल 1 सप्टेंबरपासून दोन महिन्यांसाठी खुले ठेवण्याचे निर्देश दिले. जेणेकरून व्यापाऱ्यांना (Traders and Professionals) व्यवसाय कर क्रेडिटचा दावा करता येईल. जुलै 2017 मध्ये आलेल्या या नवीन अप्रत्यक्ष कर प्रणालीनंतर अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. तज्ज्ञांनी या निर्णयाला ऐतिहासिक म्हटले आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, न्यायालयाने सरकारला 1 सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या कालावधीसाठी संबंधित फॉर्म भरण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. Live Mint च्या लेखात दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय महत्वपूर्ण आहे. तांत्रिक बिघाडांमुळे हे फॉर्म वेळेवर भरता येत नसल्याबद्दल अनेक करदात्यांनी विरोध दर्शवला होता. वेळेवर अर्ज न भरल्याने त्यांना पत परतावा मिळण्याचा अधिकार नाकारता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्पष्ट केले.

आता मिळेल फायदा

तज्ञांनी या निर्णयाचे वर्णन एक महत्त्वाचा टप्पा म्हणून केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे उत्पादन शुल्क आणि सेवाकर (Excise Duty and Service Tax) या आधीच्या प्रणालीतील टॅक्स क्रेडिटवरून सरकारविरोधात खटले लढणाऱ्या अनेक व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. जीएसटीतील बदलानंतर त्यांना फायदा घेता आला नव्हता, त्यांना हा फायदा मिळेल.

हे सुद्धा वाचा

अडकलेले पैसे मिळतील

1 सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या कालावधीसाठी संबंधित अर्ज भरण्याची परवानगी देण्याचे निर्देश कोर्टाने सरकारला दिले आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले. तांत्रिक अडचणींमुळे व्यावसायिकांना अर्ज वेळेत दाखल करता आले नाहीत. त्याविरोधात व्यावसायिकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. पण त्याचा उपयोग झाला नाही. या निर्णयामुळे या व्यावसायिकांना पतपुरवठा परतावा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे.

शेकडो व्यापाऱ्यांना होणार फायदा

ज्या व्यवसायिकांचा जीएसटी परतावा अडकला आहे अशा सर्वांसाठी ही सुवर्णसंधी मानण्यात येते. ते या याचिकेचे पक्षकार असोत वा नसोत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यांचा अडकलेला पैसा परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सेवासह उत्पादने GST मुक्त

सरकारने अनेक उत्पादने आणि सेवांवरील जीएसटी काढून टाकण्यात आला आहे. यामध्ये

रेल्वेद्वारे वाहतूक किंवा रेल्वे उपकरणे आणि सामग्रीचे जहाज करपात्र वस्तूंचा साठा किंवा गोदाम (नट, मसाले, कोपरा, गूळ, कापूस इ.) कृषी उत्पादनांच्या गोदामात धुरी देणे अथवा फवारणीसाठीच्या सेवा RBI, IRDA, SEBI, FSSAI, GSTN द्वारे सेवा. व्यावसायिक संस्थांना (नोंदणीकृत व्यक्ती) निवासी निवासस्थान भाड्याने देणे. कॉर्ड ब्लड बँकांद्वारे स्टेम पेशींच्या जतनाच्या मार्गाने पुरविल्या जाणार्‍या सेवा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.