येत्या तिमाहीत 900 लोकांना नोकरी देणार ही कंपनी

अशोक सुटा यांच्या नेतृत्वातील 11 वर्षीय जुन्या या कंपनीमध्ये जून तिमाहीत 14.7 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली. आकड्यांबद्दल बोलायचे झाल्यास टीसीएस या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीतून नोकरी सोडणाऱ्यांची संख्या कमीत कमी 8.6 टक्के होती, त्यानंतर इन्फोसिस (13.9 टक्के), विप्रो (15.5 टक्के) आहे.

येत्या तिमाहीत 900 लोकांना नोकरी देणार ही कंपनी
government job 2021

नवी दिल्लीः Happiest Minds hiring: बंगळुरूस्थित सॉफ्टवेअर कंपनी हॅपिएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज पुढील तीन तिमाहींमध्ये प्रत्येकी 300-300 कर्मचारी घेण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने ही माहिती दिली. कंपनीला काही काळापासून कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.

जून तिमाहीत 14.7 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली

अशोक सुटा यांच्या नेतृत्वातील 11 वर्षीय जुन्या या कंपनीमध्ये जून तिमाहीत 14.7 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली. आकड्यांबद्दल बोलायचे झाल्यास टीसीएस या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीतून नोकरी सोडणाऱ्यांची संख्या कमीत कमी 8.6 टक्के होती, त्यानंतर इन्फोसिस (13.9 टक्के), विप्रो (15.5 टक्के) आहे.

प्रत्येक तिमाहीत 300 लोकांना नोकरी दिली

हॅपिएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी उपाध्यक्ष जोसेफ अनंतराजू यांनी पीटीआयला सांगितले की, “आम्ही चालू आर्थिक वर्षाच्या पुढील तीन तिमाहीमध्ये प्रत्येकी 300 लोकांना कामावर घेण्याची योजना होती. 310 नवीन लोकांना सामावून घेतल्यानंतर, जून तिमाहीपर्यंत आमचे एकूण कार्यबळ 3,538 होते आणि आम्ही आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीत लोकांना नोकरी देण्याची गती राखण्याची अपेक्षा करीत होतो.

शेअर 1423 रुपयांवर बंद झाले

हॅपीएस्ट माइंड्सचा शेअर या आठवड्यात 1423 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. 52 आठवड्यांचा उच्चांक 1580 रुपये आणि सर्वात कमी स्तर 166 रुपये आहे. कंपनीचे बाजारमूल्य 20,908 कोटी रुपये आहे. जून तिमाहीत कंपनीची नेट सेल्स 230.41 कोटी होती. यामध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. निव्वळ नफा 28 टक्क्यांनी वाढून 35 कोटी झाला.

इश्यूच्या किमतीच्या तुलनेत जास्त परतावा

Happiest Minds Technologies इश्यू किंमत 165-166 रुपये ठेवण्यात आली होती. स्टॉक 111 टक्के प्रीमियमसह 351 रुपयांवर सूचीबद्ध होता. त्यानंतर या शेअरने कधीही मागे वळून पाहिले नाही. या शेअरने गेल्या एका आठवड्यात 5 टक्के, एका महिन्यात 22 टक्के आणि या वर्षी आतापर्यंत 313 टक्के परतावा दिला.

संबंधित बातम्या

करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवी सुविधा

आयकर विभागाकडून 45,896 कोटी रुपये परतावा जारी, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?

Happiest Minds Company will employ 900 people in the coming quarter

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI