AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HDFC Bank : एचडीएफसी बँकेकडून पुन्हा व्याज दरात वाढ; इएमआयसह कर्ज महागणार, जाणून घ्या नवे व्याज दर

एचडीएफसी बँकेकडून पुन्हा एकदा व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. व्याज दर वाढल्याने आता विविध प्रकारचे कर्ज महाग होणार असून, ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे.

HDFC Bank : एचडीएफसी बँकेकडून पुन्हा व्याज दरात वाढ; इएमआयसह कर्ज महागणार, जाणून घ्या नवे व्याज दर
एचडीएफसी बँकImage Credit source: TV9
| Updated on: Jul 07, 2022 | 1:07 PM
Share

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडला आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि इंधनापासून ते एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरापर्यंत सर्वच वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने (RBI) रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला, मात्र या रेपोरेट वाढीनंतर आता खासगी क्षेत्रातील बँकांनी व्याज दर वाढीचा धडका लावल्याचे दिसून येत आहे. एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीसाठी घेतलेल्या कर्जावरील एमसीएलआरमध्ये (Marginal Cost of Funds-Based Lending Rate) पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. बँकेने कर्जावरील एमसीएलआरमध्ये 20 बेसीस पॉइंटची वाढ केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे आता होम लोन, पर्सनल लोन, कार लोन असे विविध प्रकारचे लोन आणखी महाग होणार आहेत. बँकेचे नवे व्याज दर आजपासून लागू झाले आहेत.

व्याजदरात किती वाढ?

एचडीएफसी बँकेने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एक रात्रीच्या कालवधीसाठी घेतलेल्या कर्जावर एमसीएलआर वाढून 7.70 टक्के इतका करण्यात आला आहे. पूर्वी तो 7.50 टक्के इतका होता. एक महिन्याच्या कर्ज कालावधीसाठी एमसीएलआर 7.75 टक्के इतका करण्यात आला आहे. तीन महिन्याच्या कालावधीसाठी 7.80, 6 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.90 टक्के इतका नव्या दरानुसार एमसीएलआर असणार आहे. एमसीएलआरमध्ये वाढ करण्यात आल्याने आपोआपच बँकेचे विविध प्रकारचे कर्ज महाग होणार आहेत. तसेच ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

रेपो रेट वाढल्याने व्याज दरात वाढ

देशात महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. आठ जून रोजी आरबीआयने आपला रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवला होता. त्यामुळे सध्या रेपो रेट 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान त्यापूर्वी देखील मे महिन्यात आरबीआयने रेपे रेटमध्ये 0.40 टक्क्यांची वाढ केली होती. चालू आर्थिक वर्षात आरबीआयने दोनदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्यानंतर आता बँकांकडून देखील कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात येत आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप