AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना महामारीत एचडीएफसीची कमाल; अवघ्या 180 दिवसात दिले 11.47 लाख कोटींचे कर्ज

अवघ्या 180 दिवसांत बँकेने तब्बल 11.47 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे. यावरून बँकेच्या नफ्याचा तसेच खाजगी क्षेत्रातील कर्ज पुरवठ्याचा चांगला अंदाज बांधता येत आहे. (HDFC max in corona epidemic; 11.47 lakh crore in just 180 days)

कोरोना महामारीत एचडीएफसीची कमाल; अवघ्या 180 दिवसात दिले 11.47 लाख कोटींचे कर्ज
संग्रहित छायाचित्र.
| Updated on: Jul 05, 2021 | 5:34 PM
Share

मुंबई : कोरोना महामारीत विविध क्षेत्रांची घडी कोलमडली. मात्र बँकिंग क्षेत्राला या महामारीने बक्कळ नफा कमावून दिला आहे. लोकांच्या हातातील पैसे संपल्याने कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. या महामारीत लोकांनी आपला खर्च भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेकडूनही मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. या बँकेने सोमवारी सांगितले की, यावर्षी 30 जूनपर्यंत वितरित करण्यात आलेल्या कर्जाची रक्कम 14.4 टक्क्यांनी वाढून 11.47 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. अवघ्या 180 दिवसांत बँकेने तब्बल 11.47 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे. यावरून बँकेच्या नफ्याचा तसेच खाजगी क्षेत्रातील कर्ज पुरवठ्याचा चांगला अंदाज बांधता येत आहे. (HDFC max in corona epidemic; 11.47 lakh crore in just 180 days)

एचडीएफसी बँकेने सोमवारी स्टॉक एक्सचेंजला कळवले की 30 जून 2021 रोजी बँकेची प्रगती 11,475 अब्ज रुपये इतकी झाली आहे. 30 जून 2020 पर्यंत नोंद झालेल्या 10,033 अब्ज रुपयांच्या तुलनेत एकूण 14.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. 31 मार्च 2021 पासून बँकेची प्रगती जवळपास 1.3 टक्क्यांनी वाढली आहे. खासगी क्षेत्रातील या आघाडीच्या बँकेने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरपर्यंत देशांतर्गत किरकोळ कर्जाच्या व्यवसायात 10.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर देशांतर्गत घाऊक कर्जाच्या प्रमाणात जवळपास 17 टक्क्यांची वाढ झाली आहे.

रणनीतीतील बदलाचा सकारात्मक परिणाम

रणनीतीमध्ये केलेल्या बदलांमुळे बँकेच्या घोडदौडीत सकारात्मक चित्र दिसून आल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच रुजू झालेले बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी शशी जगदीशन यांनी गेल्या महिन्याच्या सुरूवातीलाच सांगितले होते की बँकेत अनेक बदलांची तयारी सुरू आहे. त्याचा परिणाम कर्जाच्या तेजीत दिसून येत आहे. बँकेच्या या प्रगतीबद्दल शशी जगदीशन यांनी आनंद व्यक्त केला आहे. “भविष्यात उपलब्ध होणाऱ्या विविध संधींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आम्ही उत्तम प्रतिभा आणि तंत्रज्ञान व डिजिटल परिवर्तनाच्या आधारावर ‘ग्रोथ इंजिन’ तयार करीत आहोत. त्याचे नाव ‘प्रोजेक्ट फ्यूचर-रेडी’ असे नाव ठेवले आहे, अशी माहिती जगदीशन यांनी दिली आहे.

ग्राहकांना लाभ

येत्या काळात विविध ग्राहक क्षेत्रांतील संधींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी केंद्रीत व्यावसायिक कार्यक्षेत्र आणि वितरण वाहिन्यांची स्थापना केली गेली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी व व्यवस्थापकीय संचालक जगदीशन म्हणाले, “मला खात्री आहे की या पायाभूत सुविधांमुळे संपूर्ण भारतभरातील रिटेल, कमर्शियल (एमएसएमई) आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील ग्राहकांना सेवा देण्याची आवश्यक कौशल्य व अंमलबजावणीची क्षमता निर्माण होईल. ‘

मार्केट कॅपने गाठला 8.26 लाख कोटींचा टप्पा

मार्केट कॅपच्या बाबतीत एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. बँकेची सध्याचे मार्केट कॅप अर्थात बाजार भांडवल 8.26 लाख कोटींच्या जवळपास पोहोचले आहे. एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँकला मागे टाकत देशातील सर्वात मोठी खासगी बँक बनली आहे. या बँकेत 1.16 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. (HDFC max in corona epidemic; 11.47 lakh crore in just 180 days)

इतर बातम्या

शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?; नारायण राणेंचा सवाल

Video : विधानसभेत तुफान राडा! अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय घडलं? भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन का?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.