AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार्चच्या तिमाहीत देशात नऊ टक्क्यांनी वाढली घरांची विक्री, मुंबई-पुण्यात मात्र घट

जानेवारी ते मार्च या तिमाहीत (Quarter) देशातील घरांची विक्री (Home sales) 9 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये 78, 627 घरांची विक्री झाली आहे, असे नाइट फ्रँक इंडियाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. देशभरात ही स्थिती असताना मुंबईत (Mumbai) मात्र उलट स्थिती आहे.

मार्चच्या तिमाहीत देशात नऊ टक्क्यांनी वाढली घरांची विक्री, मुंबई-पुण्यात मात्र घट
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: Apr 05, 2022 | 12:13 PM
Share

पुणे : जानेवारी ते मार्च या तिमाहीत (Quarter) देशातील घरांची विक्री (Home sales) 9 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये 78, 627 घरांची विक्री झाली आहे, असे नाइट फ्रँक इंडियाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. देशभरात ही स्थिती असताना मुंबईत (Mumbai) मात्र उलट स्थिती आहे. पुण्यातही तेच झाले आहे. मुंबई शहरातील घरांची विक्री 9 टक्क्यांनी तर पुण्यातील विक्री 25 टक्क्यांनी घटल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात अॅनारॉक आणि प्रॉपटायगर या संस्थांनी गृहनिर्माण क्षेत्रातील त्यांचा डेटा जाहीर केला होता. सात शहरांती घरांची विक्री 71 टक्क्यांनी वाढून 99, 550वर गेल्याचे अॅनारॉकने म्हटले होते. प्रॉपटायगरने आठ मोठ्या शहरांतील वाढ 7 टक्के आणि घरांची विक्री 70, 623वर गेल्याचे म्हटले होते.

वार्षिक आधारावर नऊ टक्क्यांनी अधिक

नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, देशातल्या महत्त्वाच्या आठ शहरांमध्ये 2022च्या पहिल्या तिमाहित 78, 627 घरांची विक्री झाली. वार्षिक आधारावर ती नऊ टक्क्यांनी अधिक आहे. हा आकडा तिसऱ्या तिमाहीत कोविडपूर्व काळातील घरांच्या विक्रीपेक्षा अधिक राहिला आहे.

सवलतीचाही परिणाम नाही

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 21, 548 घरांची विक्री झाली. इथली वृद्धी मात्र वार्षिक आधारावर नऊ टक्क्यांनी घसरली. तर पुण्यातील घरांची विक्री 25 टक्क्यांनी घसरली. येथए 10,305 घरे विकली गेली. ही मोठी घसरण आहे. कारण घरांची विक्री वाढावी, यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली. मात्र त्यानंतरही ही घसरण झाली आहे.

आणखी वाचा :

Big Bull Rakesh jhunjhunwala नी दोन कंपन्यांच्या शेअर्समधून एका महिन्यात कमावले 832 कोटी, तुमच्याकडे हे शेअर्स आहेत का?

HDFC : शेअर बाजारावर एचडीएफसीचा डंका! विलीनीकरणाच्या फायद्याचं तुम्हाला नेमका काय लाभ?

सॅनिटायझर ते कोविड औषधांवर 5% जीएसटी निश्चित, केंद्राची संसदेत माहिती

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.