एका फोनवर बँक तुमचा पैसा घरी पोहोचवते! सुविधेचा फायदा कसा घ्याल?

Door stape banking या योजनेद्वारे बँक तुमच्या घरी येऊन पैसा पोहोच करतात. यासह बँकांच्या अन्य सर्व्हिसचाही फायदा तुम्ही या योजनेद्वारे घेऊ शकता.

एका फोनवर बँक तुमचा पैसा घरी पोहोचवते! सुविधेचा फायदा कसा घ्याल?

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात बँकांनी सोशल डिस्टन्सिंगचं महत्व लक्षात घेत ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यातीलच एक सुविधा म्हणजे Door stape banking. या योजनेद्वारे बँक तुमच्या घरी येऊन पैसा पोहोच करतात. यासह बँकांच्या अन्य सर्व्हिसचाही फायदा तुम्ही या योजनेद्वारे घेऊ शकता. बँकांच्या या सुविधेच्या फायदा घेण्यासाठी ग्राहकांना एका नंबरवर फोन करावा लागणार आहे. त्यासह मोबाईल अॅप्लिकेशनद्वारेही तुम्ही बँकांच्या या योजनेचा फायदा घेऊ शकता.(How do you avail door step banking?)

भारत सरकारच्या इज ऑफ बँकिंग रिफॉर्म अंतर्गत Door stape bankingची सुरवात करण्यात आली होती. ही सुविधा पब्लिक सेक्टरच्या सर्व 12 बँकांमार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रेल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओवरसीज बँक, पंजाब अॅन्ड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँकेचा समावेश आहे. बँकिंग रिफॉर्मनुसार PSB अलायन्सकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

100 मोठ्या शहरांमध्ये सुविधा

Door stape banking ची सेवा सध्या देशातील 100 मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँक ही सुविधा देत आहेत. Door stape banking मध्ये सध्या चार सेवा देण्यात येत आहेत. त्यात नॉन फायनान्सियल बँकिंग सर्व्हिस, कॅश विड्रॉव्हल, कॅश डिपॉझिट आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट या सेवांचा समावेश आहे. PSBDSBच्या वेबसाईटवर याची माहिती उपलब्ध आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सध्या कॅश डिपॉझिटची सेवा सुरु करण्यात आलेली नाही. पण कॅश विड्रॉव्हलची सुविधा पुरवण्यात आली आहे.

पैसे कसे काढाल?

12 पब्लिक सेक्टर बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही घरबसल्या बँकेतून पैसे काढू शकता. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 18001037188 किंवा 18001213721 यावर फोन करु शकता. मात्र, या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असणं गरजेचं आहे किवा डेबिट कार्ड गरजेचं आहे. DEB एजंट तुमच्या घरी येतील आणि त्यांच्याकडून तुम्ही पैसे काढू शकता. यात मिनिमम ट्राझॅक्शन 1 हजार रुपये आणि मॅक्सिमम ट्रान्झॅक्शन 10 हजार रुपये असायला हवं. त्यासोबत तुम्ही DSB App मोबाईलमध्ये डाऊनलोड करु शकता. त्या Appच्या माध्यमातूनही तुम्ही ही सेवा मिळवू शकता.

संबंधित बातम्या :

SBI मध्ये ‘या’ लोकांनी फक्त 5 दिवसात केली 1.24 लाख रुपयांची कमाई, वाचा कशी?

SBI च्या ATM वर 8 सुविधा मिळतात मोफत; आता दिवसभरात ‘एवढे’ काढता येणार पैसे

How do you avail door step banking?

Published On - 10:00 pm, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI