नोकरी बदलताय, PF खात्यातील रक्कम कशी ट्रान्सफर कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 10:23 AM

PF Account | तुम्ही एका कंपनीतील नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असाल तर अशावेळी पीएफ नव्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणे गरजेचे आहे. कारण, नव्या कंपनीत नवीन पीएफ खाते उघडले जाते. मात्र, तुमचा UAN नंबर तोच राहतो.

नोकरी बदलताय, PF खात्यातील रक्कम कशी ट्रान्सफर कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
PF Interest Rate

मुंबई: नोकरदार व्यक्तींच्या पगारातील ठराविक रक्कम दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीत (PF) जमा होत असते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या उतारवयासाठीची पुंजी मानली जाते. तुम्ही एका कंपनीतील नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असाल तर अशावेळी पीएफ नव्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणे गरजेचे आहे. कारण, नव्या कंपनीत नवीन पीएफ खाते उघडले जाते. मात्र, तुमचा UAN नंबर तोच राहतो.

ऑनलाईन अपडेट कशाप्रकारे कराल?

कोणत्याही संस्थेला सोडण्याची माहिती अपडेट करण्यासाठी एकूण चार स्टेपमध्ये काम करावे लागेल.

>>> कर्मचाऱ्यांनी सर्वात आधी युनिफाईड सदस्य पोर्टलवर जाऊन UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर ही सेवा अपलब्ध असेल.

>>> त्यानंतर Manage या ऑप्शनवर जाऊन Mark Exit वर क्लिक करावे. त्यानंतर Select Employment करुन PF Account Number टाकावा.

>>> त्यानंतर Date of Exit आणि Reason of Exit लिहून Request OTP वर क्लिक करावे. त्यांनतर ईपीएफ अकाऊंटला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करावी.

> शेवटी Update वर क्लिक केल्यानंतर तुमच्या खात्यात Date of Exit हे अपलोड झालेले असेल.

ओटीपी टाकल्यानंतर आपल्या कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रक्रियेसाठी विनंती केली जाईल. प्रथम कंपनी पैसे हस्तांतरित करेल आणि त्यानंतर ईपीएफओचा फील्ड अधिकारी याची पडताळणी करेल. हस्तांतरण विनंती पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण ट्रॅक क्लेम स्थितीवर आपली स्थिती तपासू शकता. ऑफलाईन हस्तांतरणासाठी आपल्याला फॉर्म 13 भरावा लागेल आणि आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला द्यावा लागेल.

पीएफचे व्याज कसे मोजले जाते?

दरमहा ईपीएफ खात्यात जमा होणार्‍या मासिक रकमेच्या आधारे व्याज मोजले जाते, परंतु, वर्षाच्या शेवटी ते खात्यात जमा केले जाते. ईपीएफओच्या नियमांनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेनुसार उर्वरित रकमेमधून वर्षातून कोणतीही रक्कम काढल्यास त्यास 12 महिन्यांचे व्याज वजा केले जाते. चालू आर्थिक वर्षात जर कोणतीही रक्कम काढली गेली असेल तर वर्षाच्या सुरूवातीस ते महिन्यापर्यंत व्याज रक्कम ताबडतोब पैसे काढण्यापूर्वीच्या शुल्कासाठी आकारली जाईल.

संबंधित बातम्या:

PHOTO : पीएफ खात्यातून पैसे काढताना ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या

कंपनी बदलताय?, आता ‘हे’ काम करणं आणखी सोप्पं, जाणून पूर्ण प्रक्रिया

नोकरी सोडताना ‘हा’ फॉर्म भराच, अन्यथा तुमचे पैसे मिळवताना नाकीनऊ येईल

नोकरी सोडताना बँकेतील ही कामं करा, अन्यथा आर्थिक भुर्दंड सहन करायला तयार राहा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI