किती मोठा आहे पतंजलीचा पसारा ?, नानाविध उत्पादनांद्वारे समाजाची करते सेवा
पतंजली फूड्स लिमिटेड ही स्वदेशी प्रोडक्ट बाजारात आणत आहेत तसे कोणत्याही मोठ्या कंपनीना जमलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी पतंजली आवडती कंपनी झाली असून कंपनीच्या महसुलात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

देशात अनेक एफएमसीजी कंपन्या त्यांचे प्रोडक्ट विकत असले तरी देशातील टॉप-१० कंपन्यांमध्ये दोन एफएमसीजी कंपन्यांच्या नावाचा समावेश आहे. परंतू गेल्याकाही वर्षात पतंजलीने एफएमसीजी सेक्टरमध्ये जो करिश्मा केला आहे. तो अजूनही कोणाला करता आलेला नाही.विशेष बाब म्हणजे टाटा ग्रुप आणि मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने देखील या सेक्टरमध्ये शिरकाव केला आहे.आणि या स्पर्धेत सातत्याने वाढच होत आहे. पतंजली फूड्स लिमिटेड लिमिटेडच्या मार्केट कॅपचा विचार करता ७० हजार कोटी रुपयांपर्यंत तो पोहचला आहे, सध्या पतंजलीच्या एफएमसीजी सेक्टरमध्ये किती शेअर आहे, कंपनीचा व्यवसाय कोणत्या टप्प्यावर पोहचला आहे ते पाहूयात…
पतंजली फूड्समध्ये खाद्य तेलाचा डंका
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये पतंजली फूड्स लिमिटेडच्या फूड खाद्य तेलाच्या सेगमेंटमध्ये सुमारे ७० टक्क्यांचा हायेस्ट रेव्हेन्यू वाटा मिळविला आहे.त्यानंतर फूड आणि अन्य एफएमसीजी सेगमेंटचा नंबर आहे. त्यांचा महसूलातील वाटा सुमारे ३० टक्के पाहायला मिळाला आहे. पतंजली फूड्स एक भारतीय FMCG कंपनी असून ती भारतात ग्राहक उत्पादने आणि खाद्यतेलाची निर्मिती करते. खास बाब म्हणजे पतंजली फूड्सच्या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत असल्याने रेव्हेन्यू आणि प्रॉफीटमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
कसा आहे महसूल आणि नफा
पतंजली फूड्स लिमिटेडच्या महसुलात सातत्याने वाढ होत असून साल २०२५ च्या चौथ्या तिमाहीते निकाल अजून कंपनीने जाहीर केलेले नाहीत. परंतू तिसऱ्या तिमाहीत रेव्हेन्यूत ९,१०३.१३ कोटींची वाढ झालेली पाहायला मिळत आहे.गेल्या वर्षी याच काळात कंपनीचा महसूल ७,९१०.७० कोटी रुपये होता.म्हणजेच कंपनीच्या महसुलात वार्षिक १,१९२.४३ कोटींची वाढ झाली आहे.
तर प्रॉफिटचा जर विचार केला तर गेल्या चार तिमाहीत कंपनीचा नफा सातत्याने वाढत आहे.२०२३ च्या डिसेंबरच्या तिमाहीत नफा २१६.५४ कोटी होता. त्याच्या एक वर्षानंतर डिसेंबर २०२४ मध्ये कंपनीचा महसुल वाढून ३७०.९३ कोटी झाला होता. याचाच अर्थ कंपनीच्या प्रॉफिटमध्ये १५४.३९ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
पतंजली फूड्स शेअर किती आहे?
पतंजली फूड्स लिमिटेडच्या मार्केट कॅप खूप जास्त आहे. सध्या पतंजली फूड्सचे मार्केट कॅप सुमारे ६९ हजार कोटी रुपये आहे. अलिकडे कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे मार्केट कॅपही कमी झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात पतंजली फूड्सचे मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांच्या वर जाऊ शकते. पतंजलीचा दावा आहे की त्यांची उत्पादने पूर्णपणे हानीकारक नाहीत आणि त्यात कोणतीही रसायने नाहीत. तसेच, त्यांची सर्व उत्पादने नैसर्गिक आहेत, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून येणार आहे.
गुंतवणूकदार पैसे कसे कमवत आहेत?
पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ६ महिन्यांत ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईत चालू वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणि एका वर्षात, पतंजलीच्या शेअर्समध्ये सुमारे ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या ५ वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना ३६३ टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. ३० एप्रिल रोजी कंपनीचा शेअर ०.८७ टक्क्यांनी घसरून १,९०१ रुपयांवर बंद झाला.
पतंजली कोणती उत्पादने विकते?
पतंजली अन्न उत्पादनांपासून ते पर्सनल केअरची उत्पादने आणि औषधांपर्यंत सर्व काही विकत आहे. अन्न उत्पादनांबद्दल बोलायचे झाले तर, पतंजलीने गुलाब जामुन आणि रसगुल्ला सारख्या फूड प्रोडक्टची विक्री देखील सुरू केली आहे. त्यांच्या फूड प्रोडक्टमध्ये तूप, मैदा, डाळी, नूडल्स, बिस्कीटे आदींचा समावेश आहे. पर्सनल केअर उत्पादनांत शाम्पू, टूथपेस्ट, साबण, तेल आणि इतर उत्पादने कंपनी विकते. पतंजली आयुर्वेदिक औषधे देखील तयार करते. देशभरातील १८ राज्यांमध्ये पतंजलीची ४७००० हून अधिक रिटेल काऊंटर, ३५०० वितरक आणि अनेक गोदामे आहेत.
