या नव्या योजनेमुळे ई-पॅन कार्ड 10 मिनिटांपेक्षाही कमी वेळेत मिळणार

रियल टाईम पॅन/टॅन प्रोसेसिंग सेंटर सुरु करण्याच्या विचारात आहे, जेणेकरुन रिअल टाईम बेसिसवर (10 मिनिटांपेक्षाही कमी वेळेत) आधार बेस्ड ई-केवायसीच्या माध्यमातून पॅन जारी केलं जाईल.

या नव्या योजनेमुळे ई-पॅन कार्ड 10 मिनिटांपेक्षाही कमी वेळेत मिळणार

मुंबई : आयकर विभाग सध्या रिअल टाईम बेसिसवर ई-पॅन जारी करण्यासाठी एका प्रक्रियेवर काम करत आहे. सोमवारी संसदेत याबद्दल माहिती देण्यात आली. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरानुसार, रियल टाईम पॅन/टॅन प्रोसेसिंग सेंटर सुरु करण्याच्या विचारात आहे, जेणेकरुन रिअल टाईम बेसिसवर (10 मिनिटांपेक्षाही कमी वेळेत) आधार बेस्ड ई-केवायसीच्या माध्यमातून पॅन जारी केलं जाईल.

आयकर विभागाला आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी अनेक प्रस्तावांची सुरुवात केली असल्याचंही अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. या प्रक्रियेमुळे करदात्यांना सोयीचं होईलच, शिवाय वेळेचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल.  याच प्रक्रियेअंतर्गत पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी आयकर विभाग रिअल टाईम बेसिसवर पॅन-टॅन सेंटरवर काम करत आहे. आधार बेस्ड ई-केवायसीच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या अर्जदारांना याचा फायदा होईल.

टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाऊंट नंबर (10) एक 10 अंकी अल्फान्युमरिक नंबर आहे. केंद्र सरकारला कर देताना हा नंबर प्रत्येक करदात्याला सांगणं अनिवार्य असतं. परमनंट अकाऊंट नंबर म्हणजे PAN हा देखाली एक 10 अंकी अल्फान्युमरिक नंबर असतो, जो आयकर विभागाकडून जारी केला जातो.

करदात्यांच्या सोयीसाठी फक्त आधार कार्डवरही काम होणार असल्याचं अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलंय. पण या योजनेमुळे पॅन कार्ड धारकांची संख्या वाढू शकते. पॅन कार्ड काढण्यासाठी एजंटकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते, कागदपत्रांची जुळवाजुळव, त्यात महिनाभर वाट पाहणे यामुळे अनेक जण पॅन कार्ड न काढणंच पसंत करतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *