Auto Sector : जोरदार, जागतिक ऑटो बाजारात भारताचाही टॉप गिअर! या देशाला टाकले मागे, चीन-अमेरिकेच्या खालोखाल अशी बजावली कामगिरी

Auto Sector : ऑटो सेक्टरमध्ये भारताने ही दबदबा तयार केला आहे.

Auto Sector : जोरदार, जागतिक ऑटो बाजारात भारताचाही टॉप गिअर! या देशाला टाकले मागे, चीन-अमेरिकेच्या खालोखाल अशी बजावली कामगिरी
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 6:03 PM

नवी दिल्ली : प्रत्येक क्षेत्रात भारताची दमदार आगेकूच सुरु आहे. काही क्षेत्रात तर भारताने चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय उद्योजकांचा, अर्थतज्ज्ञांचा जगात डंका वाजत आहे. आता ऑटो सेक्टरमध्ये (Auto Sector) पण भारताने टॉप गिअर टाकला आहे. भारतीय वाहन उत्पादकांनी (Automobile Industry) जगभरात वाहन पुरवठ्यात आघाडी घेतली आहे. चीन आणि अमेरिकेनंतर आता भारताने वैश्विक बाजारात झेंडा रोवला आहे. चीप आणि सेमीकंडक्टरचे (Chip And Semi Conductor) उत्पादन भारतात सुरु झाल्यानंतर भारताला जागतिक बाजार पेठ काबीज करण्यास कोणीही रोखू शकणार नसल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत.

Nikkei Asia ने शुक्रवारी याविषयीचा अहवाल जाहीर केला. त्यात भारताने गेल्या वर्षात केलेल्या चमकदार कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. भारताने ऑटो सेक्टरमध्ये जगात तिसऱ्या स्थानी असलेल्या जपानला (Japan) मागे ढकलले आहे.

जपानला मागे टाकून भारत जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी ऑटो बाजारपेठ (India becomes World’s 3rd largest Auto Market) झाली आहे. देशात नवीन वाहनांची एकूण विक्री जवळपास 4.25 दशलक्ष युनिट असून जपानमध्ये एकूण 4.2 दशलक्ष युनिटची विक्री झाली आहे.

हे सुद्धा वाचा

Society of Indian Automobile Manufacturers यांनी आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, जानेवारी ते नोव्हेंबर 2022 याकाळात एकूण 4.13 दशलक्ष नवीन वाहनांची विक्री झाली. यामध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीचा आकडा समाविष्ट नाही.

जर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीचा एकूण आकडा जोडल्यास भारतातील एकूण वाहनांच्या विक्रीचा नवीन रेकॉर्ड तयार होईल. टाटा मोटर्ससह इतर उत्पादकांच्या व्यावसायीक वाहनांच्या चौथ्या तिमाहीतील आकड्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

चीनमध्ये 2021 या वर्षात 26.27 दशलक्ष वाहनांची विक्री करण्यात आली. त्यामुळे ग्लोबल ऑटो मार्केटमध्ये चीन सर्वात पुढे आहे. तर 15.4 दशलक्ष वाहनांसह अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे. ऑटो सेक्टरमध्ये जागतिक स्तरावर भारताचाही बोलबाला झाला आहे.

2018 मध्ये भारतात जवळपास 4.4 दशलक्ष वाहनांची विक्री करण्यात आली. परंतु, 2019 मध्ये कोरोनाच्या लाटेत ही संख्या 4 दशलक्षाने घसरली. त्यावर्षी नॉन-बँकिंग सेक्टरच्या धोरणांचा परिणाम वाहन क्षेत्रावर परिणाम दिसून आला.

कोविडविरोधातील उपाय योजनेत लॉकडाऊनचा समावेश होतो. परिणामी 2020 मध्ये विक्रीचा आकडा 3 दशलक्षाने घसरला. 2021 मध्ये पुन्हा उभारी मिळाल्याने हा आकडा 4 दशलक्ष युनिटने वाढला. ऑटो सेक्टरमध्ये चिप आणि सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा मोठा फटका बसला.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.