AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India : भारतीय अर्थव्यवस्था सुसाट, जगाच्या तुलनेत अग्रेसर रुपयापासून उत्पादनात..

India : जगावर मंदीचे सावट असताना भारतीय अर्थव्यवस्था सुसाट धावत आहे.. काय आहे अहवालात..

India : भारतीय अर्थव्यवस्था सुसाट, जगाच्या तुलनेत अग्रेसर रुपयापासून उत्पादनात..
भारतीय अर्थव्यवस्था सुसाटImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 27, 2022 | 5:50 PM
Share

नवी दिल्ली : जगावर मंदीचे (Recession) सावट वाढत असताना भारतीय अर्थव्यवस्थेने (Indian Economy) मात्र चमत्कार घडवला आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत सुसाट वेगाने पुढे जात असल्याचा दावा नव्या अहवालात (New Report) करण्यात आला आहे. भारतीय रुपयाची (Rupee) कमाल घसरण होत असली तरी इतर देशाच्या चलनापेक्षा भारतीय रुपया चांगल्या स्थितीत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

या सर्व सकारात्मक परिस्थितीमुळे भारतात गुंतवणूक वाढण्याची शक्यता ही वर्तविण्यात आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात कमाल घसरण होत असली तरी इतर चलनाच्या मानाने ही घसरण फार मोठी नाही. त्यामुळे गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहेत.

न्यूयॉर्क येथील न्यूज एजेंसी यूएस न्यूजने (US News) हा सर्वे केला आहे. त्यात 78 देशांची त्यांनी रॅकिंग केली. त्यात ओव्हरऑल परफॉर्मेन्सच्या आधारे भारताला चांगले मानांकन मिळाले आहे.

या सर्वेक्षणानुसार, उत्पादनाचा सर्वात कमी खर्च भारतात आहे. उत्पादन खर्च कमी असल्याने परदेशी कंपन्यांचे भारतीय बाजाराकडे लक्ष लागले आहे. चीन या यादीत दुसऱ्या तर व्हियतनाम तिसऱ्या स्थानी आहे.

उत्पादन खर्चात भारत जगात सर्वात स्वस्त देश असला तरी सर्वांगीण चाचणीत मात्र देशाचे स्थान 31 व्या स्थानी आहे. त्यामुळे भारताला इतर सोयी-सुविधा पुरविण्यात बदल करावे लागणार आहे.

मेक इन इंडिया आणि पीएलआय सारख्या योजनामुळे भारतात उत्पादन खर्च कमी झाला आहे. जागतिक संस्थांच्या अहवालानी ही सरकारच्या या दाव्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

भारतीय रुपयाची विक्रमी घसरण सुरु आहे. गेल्या वर्षभरात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 9.64 टक्के घसरला आहे. भारतीय रुपयाची कामगिरी डॉलरच्या तुलनेत अत्यंत वाईट आहे.

परंतु, ऑस्ट्रेलियाचे चलन डॉलरच्या तुलनेत 16 टक्के, चीनचे चलन 12.5 टक्के, युरो 16.27, न्यूझीलंडचे चलन 23 टक्के, दक्षिण कोरियाचे चलन 21 टक्के, जपानचे चलन 28 टक्के घसरले आहे. त्यामानाने भारतीय रुपया मजबूत स्थितीत असल्याचा दावा आकड्यांआधारे करण्यात आला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.