AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Power Crisis : ऊर्जा संकटात सुचलं शहाणपण, प्रकल्प उभारणीत धोरणात्मक बदल

एकीकडे देशात कोळशाचा साठा कमी होत आहे तर जागतिक पातळीवर देशाला इंधन पुरवठ्यात अडचणी येत असताना कडक उन्हाळ्यात भारतातील अनेक राज्यांना दीर्घकाळ वीज तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. देशातील अनेक भागात दिवसातून आठ आठ तास विद्युत पुरवठा खंडित असतो

Power Crisis : ऊर्जा संकटात सुचलं शहाणपण, प्रकल्प उभारणीत धोरणात्मक बदल
कोळशाबाबतची मोठी बातमीImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 2:45 PM
Share

 मुंबई : भारतातील सरकारी वीज कंपनी एनटीपीसी लिमिटेडने (NTPC)कोळशावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पांचा (coal-fired power) विस्तार करण्याची योजना आखली आहे. ऊर्जा संकटाचा ‘करंट’ बसल्यानंतर NTPC ला हे शहाणपण सुचले आहे. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्प उभारणीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यात एनटीपीसीला एकदाचे यश आले आहे. सहा वर्षांतील पहिला नवीन प्रकल्पा उभारणीचा धोरणात्मक बदल करण्यात आला आहे. देशातील वाढत्या वीज संकटावर (power crisis)मात करण्यासाठी तहान लागली की विहीर खोदण्याची अस्सल कामगिरी एनटीपीसीने बेमालूमपणे केली आहे. नवी दिल्लीस्थित एनटीपीसी या महिन्यात ओडिशामध्ये 1,320 मेगावॅटचा प्रकल्प (plant) बांधण्याचे कंत्राट देणार आहे, अशी माहिती या योजनेची माहिती असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली. मध्य भारतातील लारा आणि सिंगरौली (Lara and Singrauli sites) या ठिकाणी यापूर्वी रखडलेल्या दोन विस्तार प्रकल्पांसाठी कंत्राटे देण्याबाबतही कंपनी विचार करेल, अशी माहिती या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली.

एनटीपीसीने मंगळवारी टिप्पणीसाठी ईमेल केलेल्या इकॉनॉमिक टाइम्सच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही, कारण भारतात आज अक्षय तृतीया आणि ईदमुळे सार्वजनिक सुट्टी आहे.

ऊर्जा क्षमता वाढवण्याचे प्रयत्न

एकीकडे देशात कोळशाचा साठा कमी होत आहे तर जागतिक पातळीवर देशाला इंधन पुरवठ्यात अडचणी येत असताना कडक उन्हाळ्यात भारतातील अनेक राज्यांना दीर्घकाळ वीज तुटवड्याचा सामना (electricity supply) करावा लागत आहे. सध्या देशातील अनेक भागात दिवसातून आठ आठ तास विद्युत पुरवठा खंडित आहे. यापूर्वी एनटीपीसीची लारा आणि सिंगरौली प्रकल्पांना पुढे नेण्याची योजना मंदावली होती. कारण साथीच्या रोगाच्या काळात विजेची मागणी कमी झाली होती. कोळशाऐवजी नवीन पर्यायाचा ऊर्जा क्षमता वाढवण्याच्या प्रस्तावांवरही उत्पादक भर देत आहे.

उत्पादनात 83 टक्के जीवाश्म इंधनाचा वाटा

सध्या कोळशाआधारे उत्पादनावर कंपनी अवलंबून असली तरी हरीत आणि स्वच्छ ऊर्जा उत्पादनावर कंपनी भर देणार आहे. सध्या ऊर्जा उत्पादनात 83 टक्के जीवाश्म इंधनाचा वाटा आहे, तो कमी करत 2032 पर्यंत जीवाश्म इंधनांचा वाटा निम्म्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

कसा वापर करावा?

अजूनही सुमारे 70 टक्के वीजनिर्मितीसाठी कोळशावर अवलंबून असलेला भारत जीवाश्म इंधनाचा अधिक कार्यक्षमतेने कसा वापर करू शकतो, हे ‘एनटीपीसी’च्या ओडिशा प्रकल्पाच्या योजनांवरून स्पष्ट होते, असे बेंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे ऊर्जा व हवामानाचे प्राध्यापक आर. श्रीकांत यांनी सांगितले. “असे करण्याचा एक मार्ग म्हणजे सर्व जुने वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने काढून टाकणे गरजेचे आहे आणि त्याऐवजी आधुनिक प्रकल्पांचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे कोळशाचा वापर कमी होईल. आणि समान प्रमाणात ऊर्जा निर्मिती होईल.” असे श्रीकांत यांनी स्पष्ट केले.

एनटीपीसीचा नवीन प्रकल्प त्याच ठिकाणी एका छोट्या प्रकल्पाची जागा घेईल जी गेल्या वर्षी पाच दशकांहून अधिक काळानंतर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली होती.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.