Share Market: शेअर बाजारात आले तुफान, गुंतवणूकदार झाले झटक्यात मालामाल, छापले 7 लाख कोटी
Share Market Boom : अमेरिकेच्या प्रशासनाने जगातील देशावर टॅरिफ लावण्याच्या निर्णयाला काही दिवसांची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. येत्या 90 दिवस निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. त्याचा थेट परिणाम आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रावर दिसून आला. शेअर बाजाराला भरते आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लावले होते. या निर्णयाने एकच खळबळ उडाली होती. तर अमेरिका प्रशासनाने जगातील देशावर टॅरिफ लावण्याच्या निर्णयाला काही दिवसांची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. येत्या 90 दिवस निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. त्याचा थेट परिणाम आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रावर दिसून आला. शेअर बाजाराला भरते आले. शुक्रवारी मुख्य निर्देशांक सेन्सेक्स जवळपास 1,000 अंकांच्या तेजीसह उघडला. सकाळी निर्देशांक 74,956.53 अंकांवर व्यापार करत होता. याशिवाय विविध क्षेत्रातील निर्देशांकांनी पण चांगली घोडदौड केली. मेटल आणि फार्मा कंपन्यांनी चांगली उसळी घेतली. सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी जवळपास 7 लाख कोटी रुपये छापले.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 1.70 टक्क्यांच्या तेजीसह 75,101.19 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी 1.68 टक्क्यांच्या तेजीसह 22,774.75 वर व्यापार करत होता. निफ्टीमध्ये 375.60 अंकांची तेजी दिसली. तर सेन्सेक्सच्या 30 शेअरमधील 25 शेअर्स हिरव्या रंगात न्हाहले. तर 5 लाल रंगात अडकले.
काल तर गुंतवणूकदारांचे हाल
बुधवारी 9 एप्रिल रोजी भारतीय बाजारात मोठी घसरण दिसली. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या घसरणीचे सत्र सुरू आहे. मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये अर्ध्याहून अधिक घसरण दिसून आली होती. सेन्सेक्स बुधवारी 0.51 टक्के घसरणीसह म्हणजे 379.93 अंक घसरून 73,847.15 अंकावर बंद झाला होता. तरीही सेन्सेक्समधील 30 मधील 12 स्टॉक तेजीत होते.
नेस्ले इंडिया याने पडत्या बाजारात सुद्धा 3.24 टक्क्यांच्या तेजीसह मोठी उसळी घेतली होती. तर एसबीआय टॉप लूजरमध्ये होती. एसबीआयचा शेअर 3.43 टक्क्यांसह घसरला होता. निफ्टीमध्ये बुधवारी 0.61 टक्क्यांसह म्हणजे 136.70 अंक घसरून 22,399.15 अंकांवर बंद झाला. या दरम्यान निफ्टीच्या 50 मधील 18 स्टॉक तेजीत होते. तर आज सकाळी बाजाराने पुन्हा चाल बदलली. दलाल स्ट्रीटवर गुंतवणूकदारांचे चेहरे खुलले
सेन्सेक्सचे टॉप गेनर शेअर
शेअर बाजारातील तेजीच्या सत्रात सेन्सेक्सचे 30 शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी टाटा स्टीलच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअरमध्ये 5.23 टक्क्यांची तेजी दिसली. हा शेअर 133.85 रुपयांवर व्यापार करत आहे. तर जेएसडब्लू स्टील, हिंडाल्को आणि सिपलाच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
